यशस्वी जीवनासाठी सकारात्मक राहा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यशस्वी जीवनासाठी सकारात्मक राहा
यशस्वी जीवनासाठी सकारात्मक राहा

यशस्वी जीवनासाठी सकारात्मक राहा

sakal_logo
By

62574
आंबोली ः लेफ्टनंट दीपाली गावकर यांचा सत्कार करताना मान्यवर.

यशस्वी जीवनासाठी सकारात्मक राहा

लेफ्टनंट दीपाली गावकर ः आंबोली येथे सैनिक स्कूलच्यावतीने सन्मान

आंबोली, ता. १५ ः जीवनात वाटचाल करताना नेहमी सकारात्मक दृष्टिकोन, प्रामाणिकपणा बाळगा. लहानशा अपयशाने खचून न जाता यशासाठी प्रयत्नशील राहा, असा कानमंत्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या महिला सैन्य अधिकारी लेफ्टनंट दीपाली गावकर यांनी आंबोली सैनिक स्कूलच्या विद्यार्थ्यांना दिला.
सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली आणि सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट एक्स सर्व्हिसमेन असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्गातील पहिल्या महिला अधिकारी लेफ्टनंट दीपाली गावकर यांचा येथील सैनिक स्कूलमध्ये सैनिकी परंपरेनुसार मानवंदना देऊन सन्मान करण्यात आला.
भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. संस्था सचिव सुनील राऊत यांनी प्रास्तावनेत सैनिक स्कूलच्या स्थापनेमागील उद्देश व्यक्त केला. जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातील एका मुलीने ग्रामीण भागात शिक्षण घेऊन भारतीय सैन्यात अधिकारी होण्याची कामगिरी अद्वितीय असून जिल्ह्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद करण्यासाठी आहे. याचा आदर्श सैनिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. कॅप्टन दीनानाथ सावंत यांच्या हस्ते लेफ्टनंट गावकर यांचा सत्कार झाला. लेफ्टनंट गावकर यांच्या मातोश्री वर्षा गावकर यांचाही आयईएसएल सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष सुभेदार शशिकांत गावडे, सैनिक पतसंस्थेचे चेअरमन सुभेदार मेजर शिवराम जोशी यांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला.
सैनिक स्कूलचे संचालक शिवाजी परब, आप्पा राऊळ, शंकर गावडे, जॉय डॉन्टस, राजाराम वळंजू, कार्यालयीन सचिव दीपक राऊळ, सैनिक पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन हिंदबाळ केळुस्कर, संचालक मंगेश गावकर, भिवा गावडे, चंद्रकांत शिरसाट व आयईएसएलचे पदाधिकारी दीपक राऊळ, कुडाळ तालुकाध्यक्ष कॅप्टन व्हिक्टर पिंटो, कृष्णा परब, सदानंद मोहिते, चंद्रशेखर जोशी, आत्माराम गावडे आदी उपस्थित होते. आर. आर. गावडे यांनी सूत्रसंचालन केले. ज्येष्ठ शिक्षक नितीन गावडे यांनी स्वागत केले. प्राचार्य एस. टी. गावडे यांनी आभार मानले.
--
शेतकऱ्याची मुलगी ते सैन्य अधिकारी!
यावेळी लेफ्टनंट गावकर यांनी बांव (ता.कुडाळ) गावातील एका सामान्य शेतकऱ्याची मुलगी ते सैन्य अधिकारी लेफ्टनंटपर्यंतचा प्रवास, अनुभव सैनिक स्कूलच्या बालसैनिकांसमोर कथन केला. तसेच ‘एसएसबी’ परीक्षेतील विविध चाचण्यांबाबत मार्गदर्शन केले. सैनिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचे मनोबल आणि आत्मविश्वास वाढविण्यामध्ये लेफ्टनंट गावकर यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे आणि प्रेरणादायी ठरले.