मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा
मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा

मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा

sakal_logo
By

62576
सावंतवाडी : पालिका प्रशासनाकडे निवेदन देताना ज्येष्ठ नागरिक.

मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा

ज्येष्ठ नागरिकांची मागणी; पालिका प्रशासनास निवेदन

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १५ ः शहरात मोकाट फिरणाऱ्या कुत्रे व गुरांचा बंदोबस्त करा, अशी मागणी येथील ज्येष्ठ नागरिक संघातर्फे पालिका प्रशासनाकडे करण्यात आली. मोकाट जनावरांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. पदपथांवर फिरताना कुत्रे आणि गुरांमुळे नागरिकांना जीव मुठीत धरून चालावे लागते. त्यामुळे पालिका हद्दीत कोंडवाडा बनवून त्यात गुरांची रवानगी करावी, अशी मागणीही त्यांनी केली. याबाबत पालिकेच्या प्रशासक अधिकारी आसावरी शिरोडकर यांच्याकडे निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद केले आहे की, शहरात मोकाट जनावरांचा वावर दिवसेंदिवस वाढत आहे. पदपथांवर मोठ्या प्रमाणात गुरे फिरताना दिसतात. बरीचशी जनावरे मोती तलावाच्या काठावर ठाण मांडून बसतात. त्याचा नाहक त्रास ज्येष्ठ नागरिकांसह महिलांना व मुलांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे अशा जनावरांसाठी कोंडवाडा स्थापन करून त्या ठिकाणी त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे. यावेळी अण्णा देसाई, बळवंत मसुरकर, प्रा. एम. व्ही. कुलकर्णी, प्रा. दिलीप गडकर, प्रदीप पियोळकर, अरुण मेस्त्री, शंकर प्रभू, प्रदीप ढोरे, अशोक बुगडे, मुकुंद वझे, प्रकाश मसुरकर, श्यामसुंदर भाट आदी उपस्थित होते.