सीईओंची ‘ती’ भेट चर्चेचा विषय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सीईओंची ‘ती’ भेट चर्चेचा विषय
सीईओंची ‘ती’ भेट चर्चेचा विषय

सीईओंची ‘ती’ भेट चर्चेचा विषय

sakal_logo
By

62582
प्रजित नायर
--
49788
पेस्टेड दिसेल घ्या
-------

सीईओंची ‘ती’ भेट चर्चेचा विषय

जिल्हा परिषदेतील चित्र; वित्त विभागात जाऊन अधिकाऱ्यांशी चर्चा, ‘कामचुकार’ धारेवर?

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १५ ः जिल्हा परिषद प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी सोमवारी दुपारनंतर आपले दालन सोडत थेट मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांचे दालन गाठले. सुमारे दोन ते अडीच तास त्यांनी मुख्य लेखा व वित्त अधिकारी तसेच प्रभारी उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्याशी चर्चा केली; मात्र नायर यांनी या दालनात जाऊन कोणती चर्चा केली? की झाडाझडती घेतली? याबाबत पूर्णतः गोपनीयता राखण्यात आली आहे.
सीईओ नायर यांच्या त्या भेटीची चर्चा आज दिवसभर जिल्हा परिषदेत रंगली होती. सीईओ नायर यांना वित्त विभागाच्या अधिकारी यांच्याशी चर्चा करायची होती तर ते त्यांना आपल्या दालनात बोलवू शकले असते; मात्र त्यांनी तसे न करता थेट मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांचेच दालन गाठले. व्हिजीटसाठी गेले तर ते अर्ध्या किंवा एक तासात बाहेर पडले असते; परंतु दोन ते अडिज तास त्यांनी बंद दाराआड चर्चा केल्याने नेमके काय घडले? याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. यावेळी त्यांच्या सोबत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस उपस्थित होते. मुख्य लेखा व वित्त अधिकारी, प्रभारी उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी हे सुध्दा उपस्थित होते.
अलीकडे वित्त विभागाच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. कितीही महत्वाची फाईल असली तरी ती पुढे सरकत नाही. अगदी प्रशासनाने खर्च केलेल्या फाईलसुद्धा अडविली जाते. क्युरी काढण्याचा सपाटा येथील काही अधिकारी कर्मचाऱ्यांनी लावल्याचा आरोप आहे. ठेकेदारांची तर याबाबत तीव्र नाराजी आहे. सीईओ नायर यांच्याकडेसुद्धा याबाबत लोकप्रतिनिधी व अन्य प्रशासनाकडून वारंवार तक्रारी आल्या आहेत. याबाबत नायर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचनाही दिल्या होत्या. तरीही या विभागातील काही अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीत सुधारणा झालेली नव्हती. याच पार्श्वभूमीवर सीईओ नायर यांनी काल (ता.१४) थेट मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांचे दालन गाठल्याचे बोलले जात आहे.
--
चौकट
कामचुकारांबाबत आक्रमक?
सुमारे अडिच तास त्यांनी मुख्य लेखा व वित्त अधिकारी तसेच उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्याशी चर्चा केल्याचे समजते; मात्र यावेळी अन्य कोणाला आतमध्ये घेण्यात आले नव्हते. दरम्यान, श्री. नायर यांनी कामचुकार व बेजबाबदार प्रशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. बांधकाम विभागाच्या दोन कर्मचाऱ्यांना निलंबित केले. एका ग्रामसेवकालाही निलंबित केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
----------------

उभादांडाच्या ग्रामसेवकांवर
निलंबनाची कठोर कारवाई
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. १५ ः प्रशासकीय कामात हयगय केल्याप्रकरणी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी उभादांडाचे (ता.वेंगुर्ले) ग्रामसेवक यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.
सीईओ नायर यांनी प्रशासकीय कामात गतिमानता आणण्यासाठी कामचुकार व कामात हयगय करणाऱ्यांवर कारवाई बडगा सुरू केला आहे. मागील वर्षी त्यांनी एकाच वेळी पाच कर्मचाऱ्यांवर कारवाई केली होती. त्यानंतर आता पुन्हा कठोर पावले उचलत कारवाई सुरू केली आहे. कामांचा दर्जा न राखणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत न टाकता त्यांना वाचवल्याप्रकरणी बांधकाम विभागातील दोन कर्मचाऱ्यांना त्यांनी तडकाफडकी निलंबित केले होते. त्यानंतर आता कामात हयगय केल्याप्रकरणी उभादांडा येथील ग्रामसेवकाला निलंबित केले आहे. त्यांनी कोकण आयुक्तांनी एका घरासंदर्भात दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी न करता आयुक्तांच्या आदेशाचा अवमान केला तसेच ‘आपले सरकार’ योजनेंतर्गत काम करणायऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन अदा केले नाही. लेखा परीक्षण अवालही वेळेत दिला नाही, आदी मुद्यांच्या आधारे कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत निलंबन कारवाई केली.