पालगड नळपाणी योजनेचे आज पुन्हा भूमिपूजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालगड नळपाणी योजनेचे आज पुन्हा भूमिपूजन
पालगड नळपाणी योजनेचे आज पुन्हा भूमिपूजन

पालगड नळपाणी योजनेचे आज पुन्हा भूमिपूजन

sakal_logo
By

rat१५p३८.jpg
६२५८१
सोंडेघरः पत्रकार परिषदेत माहिती देताना ग्रामस्थ.

पालगड नळपाणी योजनेचे आज पुन्हा भूमिपूजन
६ ऑगस्टला झाले योगेश कदम यांच्या हस्ते; आता तटकरे यांच्या हस्ते
दाभोळ, ता. १५ ः दापोली तालुक्यातील पालगड गावासाठी मंजूर झालेल्या नळपाणी योजनेचे आमदार योगेश कदम यांच्या हस्ते ६ ऑगस्टला भूमिपूजन झालेले असताना खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते याच नळपाणी योजनेचे भूमिपूजन उद्या (ता.१६) दुपारी ३ वाजता करण्याचा घाट पालगड ग्रामपंचायतीच्यावतीने घालण्यात आल्याचा आरोप पालगड ग्रामपंचायतीचे सदस्य कासीम महालदार यांनी पत्रकार परिषदेत केला.
माजी पर्यावरणमंत्री रामदास कदम व आमदार योगेश कदम यांच्या पुढाकाराने व प्रयत्नाने पालगड गावासाठी ५ कोटी २३ लाख ५९ हजार रुपये खर्चाची जलजीवन मिशनमधून नळपाणी योजना मंजूर करण्यात आली. या कामाचे कार्यादेश ठेकेदाराला मिळाल्यावर आमदार योगेश कदम यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन ६ ऑगस्टला करण्यात आले. त्यानंतरच्या ३ महिन्यात या नळपाणी योजनेचे पाईप टाकण्याचे कामही ठेकेदाराने सुरू केले असून सोंडेघर धरण ते सोंडेघर फाटादरम्यान पाईप टाकण्याचे कामही प्रगतीपथावर असताना अचानक जाग आलेल्या पालगडच्या सरपंचांनी ग्रामस्थांना तसेच पाणीपुरवठा व स्वच्छता समितीच्या सदस्यांना विश्वासात न घेताच ग्रामपंचायतीच्यावतीने खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते उद्या (ता. १६) दुपारी ३ वाजता या पाणीयोजनेच्या भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती महालदार यांनी दिली.
पालगड गावासाठी स्वतंत्र पाणीयोजना व पूज्य सानेगुरूजी यांचे स्मारक यांची कामे मार्गी लागावीत यासाठी आम्ही ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध केली; मात्र पाणीयोजना मंजूर व्हावी यासाठी कोणतेही योगदान नसलेल्यांनी आता केवळ श्रेयवादासाठी या पाणीयोजनेचे पुन्हा भूमिपूजन करण्याचा घाट घातला आहे. पालगडच्या ग्रामस्थांना सर्व वस्तुस्थिती माहितही आहे, असेही महालदार यांनी यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला माजी सभापती प्रकाश कालेकर, संतोष दळवी, अविनाश चव्हाण, संदेश जाधव, अमोल भडवळकर, सुहास पवार, सुरेश गौरत, शरद महाडिक, राजाराम येसरे, सतीश कोशिमकर, अनंत भडवळकर, संजय कोशिमकर उपस्थित होते.