गार्बेज डेपोतून साहित्य चोरीस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गार्बेज डेपोतून साहित्य चोरीस
गार्बेज डेपोतून साहित्य चोरीस

गार्बेज डेपोतून साहित्य चोरीस

sakal_logo
By

गार्बेज डेपोतून साहित्य चोरीस
कणकवली ः शहरातील हरकुळ बुद्रुक येथील कणकवली नगरपंचायतीच्या गार्बेज डेपोमधून सुमारे ३० हजार रुपयांचे साहित्य चोरीस गेले. ११ ते १४ नोव्हेंबर दरम्यान चोरीची ही घटना घडली. याबाबत नगरपंचायत कर्मचारी विनोद मोहन सावंत (वय ४० सध्या रा. सावंतवाडी) यांनी येथील पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. प्रत्येकी दहा हजार रुपये किमतीच्या तीन मशिनरी अज्ञाताने चोरून नेल्या आहेत. हे साहित्य शेडमध्ये होते. ते कोणत्यातरी हत्याराच्या साह्याने कापून नेल्या आहेत. याची किंमत सुमारे ३० हजार रुपये आहे. याबाबत पोलिसात अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला.