मोटार उलटून दोघे जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोटार उलटून दोघे जखमी
मोटार उलटून दोघे जखमी

मोटार उलटून दोघे जखमी

sakal_logo
By

62608
अपघातग्रस्त मोटार.

मोटार उलटून दोघे जखमी

नेमळेतील घटना; टायर फुटल्याने अपघात

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १५ ः टायर फुटल्याने मोटार उलटून झालेल्या अपघातात आजगाव येथील दोघे किरकोळ जखमी झाले. हा अपघात आज सकाळी नऊच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर नेमळे येथे घडला. बाबल गावडे व विठ्ठल केदार (दोघेही रा. आजगाव) अशी त्यांची नावे आहेत. जखमींना अधिक उपचारासाठी कुडाळ येथे हलविण्यात आले होते. या अपघाताची सावंतवाडी पोलिस ठाण्यात कोणतीही नोंद नसल्याचे सांगण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, आपल्या ताब्यातील मोटारीने ओरोस येथे जात होते. झाराप-पत्रादेवी बायपासवरून जात असताना नेमळे येथे स्वामी समर्थ मठाजवळ मोटारीचा टायर फुटल्याने गाडी रस्त्याच्या बाजूला जाऊन पलटी झाली. सुदैवाने या अपघातात कोणालाही मोठी दुखापत झाली नाही. अपघातानंतर मळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते दीपक जोशी, संजय जोशी यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदतकार्य केले. त्यानंतर अन्य ग्रामस्थांच्या मदतीने उपचारासाठी कुडाळ येथे हलविले.