बांदा ग्रामस्थांची वार्षिक माणगाव पदयात्रा उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बांदा ग्रामस्थांची वार्षिक
माणगाव पदयात्रा उत्साहात
बांदा ग्रामस्थांची वार्षिक माणगाव पदयात्रा उत्साहात

बांदा ग्रामस्थांची वार्षिक माणगाव पदयात्रा उत्साहात

sakal_logo
By

62606
बांदा ः माणगाव पदयात्रेत सहभागी पदयात्रींसह भाविक व ग्रामस्थ.

बांदा ग्रामस्थांची वार्षिक
माणगाव पदयात्रा उत्साहात
बांदा, ता. १५ ः बांदा ग्रामस्थ पदयात्रा मंडळाच्या वार्षिक पदयात्रांचा प्रारंभ झाला असून मंगळवारी बांदा ते माणगाव पदयात्रा उत्साहात व भक्तिमय वातावरणात झाली.
दरवर्षी बांदावासीयांची पहिली पदयात्रा श्रीक्षेत्र माणगावला होते. बांदा ते माणगाव पायी जाऊऩ श्री. प. प. वासुदेवानंद सरस्वती टेंब्येस्वामी महाराज संस्थापित श्री दत्तमंदिराचे दर्शन घेण्यात येते. यंदा पदयात्रेला ग्रामस्थांचा उत्तम प्रतिसाद लाभला. ज्येष्ठ नागरिक तसेच महिलांनीही पदयात्रेत सहभाग घेतला. पहाटेच्या वेळी श्री देव बांदेश्वर भूमिका दर्शन घेऊन पदयात्रींनी प्रस्थान केले. दुपारी ही पदयात्रा माणगावला पोहोचली. दर्शन घेऊन सर्वांनी माध्यान्ह आरती व महाप्रसादाचा लाभ घेतला. येथील अऩ्य अनेक भाविकही यावेळी माणगावला आले होते. यावेळी सामुहिक नामस्मरण करण्यात आले. त्यानंतर पदयात्रेचे सदस्य बांदा येथे परत आले. यापुढील दाणोली पदयात्रेची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असून ग्रामस्थांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष उमेश मयेकर यांनी केले.