अवैध व्यवसायात कोणाचे कार्यकर्ते? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अवैध व्यवसायात कोणाचे कार्यकर्ते?
अवैध व्यवसायात कोणाचे कार्यकर्ते?

अवैध व्यवसायात कोणाचे कार्यकर्ते?

sakal_logo
By

62615
परशुराम उपरकर

अवैध व्यवसायात कोणाचे कार्यकर्ते?

परशुराम उपरकर ः आमदार नितेश राणेंवर टीका, पोलिसांविरोधात आंदोलनाची भाषा अशोभनीय

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. १५ ः जिल्ह्यात अवैध व्यवसायात मोठी वाढ झाली आहे; मात्र आमदार नितेश राणे यांना केवळ देवगड व जामसंडे या दोन गावातीलच अवैध धंदे दिसतात. या गोवा बनावट दारू व्यवसायत कोणाचे कार्यकर्ते आहेत? ते नितेश राणे यांनी तपासावेत, अशी टीका मनसे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेतून केली. राज्याचे गृहमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री भाजपचे असूनही राज्यातील सत्ताधारी पक्षाचे आमदार असलेल्या राणेंना अवैध धंद्यांमुळे पोलिसांविरोधात आंदोलन करण्याची भाषा करावी लागते हे शोभत नाही, असेही ते म्हणाले.
येथील मनसेच्या कार्यालयात उपरकर यांनी आमदार राणे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, "नूतन पोलिस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल यांची मनसे शिष्टमंडळाने भेट घेतली. जिल्ह्यातील अंमली पदार्थ तसेच अवैध धंद्याबाबत कारवाई करण्यासाठी निवेदन दिले आहे; मात्र आमदार राणे हे केवळ देवगड आणि जामसंडे या भागाकडे लक्ष देत आहेत. त्यांच्या मतदारसंघात तीन तालुके येतात हे त्यांनी लक्षात ठेवावे. बांदा येथे ज्या माजी सरपंचांची गाडी अवैध दारू वाहतुकीत पकडली होती, तो कोणत्या पक्षाचा कार्यकर्ता आहे. गृहमंत्री, पालकमंत्री स्वतःच्या पक्षाचे असूनही राज्यातील सत्ताधारी पक्षाचे आमदार असलेल्या राणेंना अवैध धंद्यांमुळे पोलीसांविरोधात आंदोलन करण्याची भाषा शोभत नाही. दारू, मटका आणि अंमली पदार्थांमुळे अनेक तरुणांनी जिल्ह्यात आत्महत्या केल्या आहेत. जिल्ह्यात अंमली पदार्थ तसेच अवैध धंद्यात कोणत्याही पक्षाचे कार्यकर्ते असले तरीही युवा पिढी बरबाद करणाऱ्या या बेकायदेशीर धंद्यांना कोणत्याही राजकीय पदाधिकाऱ्यांनी पाठीशी घालू नये."
--
लोकप्रतनिधींनी एकत्र यावे
उपरकर म्हणाले, ‘‘अवैध धंदे बंद होण्यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी एकत्र येण्याची गरज आहे. तरुणांच्या हाताला काम नाही म्हणून अशा अवैध धंद्याकडे तरुण पिढी वळत आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी अशा तरुणांना नोकऱ्या आणि रोजगाराचे साधन उपलब्ध करून द्यावे. मग तरुण पिढी बरबादीकडे वळणार नाही. जिल्ह्यातील अवैध धंदे बंद झालेच पाहिजेत ही मनसेची मागणी असून त्यासाठी लढा देण्याची ही आमची तयारी आहे.’’
-------
चौकट
टोल वसुलीच्या हालचाली
महामार्गावरील टोल वसुलीच्या हालचाली पुन्हा एका सुरू झाल्या आहेत. यात एका नेत्याचा हात आहे. त्याच्या समर्थकाने ठेका घेतला आहे. जिल्ह्यातीलच एका बड्या उद्योजकाने टोलवसुलीचा ठेका भरला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील महामार्गाचे काम अर्धवट असताना पुन्हा एकदा टोल वसूली सुरू होण्याची शक्यता आहे; मात्र मनसेचा याला विरोध राहील, असे उपरकर यांनी सांगितले.