काँग्रेसचे स्वयंघोषित नेते मांडवलीसाठी भाजपकडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

काँग्रेसचे स्वयंघोषित नेते
मांडवलीसाठी भाजपकडे
काँग्रेसचे स्वयंघोषित नेते मांडवलीसाठी भाजपकडे

काँग्रेसचे स्वयंघोषित नेते मांडवलीसाठी भाजपकडे

sakal_logo
By

काँग्रेसचे स्वयंघोषित नेते
मांडवलीसाठी भाजपकडे

गणेश भोगटे यांची कुडाळात टीका

कुडाळ, ता. १५ ः काँग्रेसचे येथील एक स्वयंघोषित नेते कोणत्या मांडवलीसाठी भाजप कार्यालयात येरझाऱ्या घालतात? असा सवाल भाजपचे नगरसेवक गणेश भोगटे यांनी पत्रकातून उपस्थित केला आहे.
भोगटे यांनी पत्रकात म्हटले आहे की, ७ नोव्हेंबरला दुपारी एकला काँग्रेसचे येथील एक स्वयंघोषित नेते भाजप कार्यालयात तासनतास बसून कोणती मांडवली करत होते? भाजप कार्यालयात येताना त्यांनी पक्षाप्रती असलेली निष्ठा कुठे गहाण ठेवली होती? यापूर्वी त्यांचे रात्रीचे चालणारे खेळ आता दिवसाढवळ्या सुरू झाले आहेत. यावरून काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवू नये. या नेत्याला भाजप कार्यालयात बसलेले पाहिल्यानंतर कुडाळ काँग्रेसही भाजपमध्ये विलीन केली आहे का? अशी विचारणा येथील काही नागरिकांनी केली. काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि कुडाळवासीयांनी त्यांच्यापासून सावध रहावे. ते स्वतःच्या फायद्यासाठी कुणाचाही बळी देऊ शकतात. राजरोसपणे दिवसाढवळ्या हे स्वयंघोषित नेते लोकांना काय वाटेल याचा विचार न करता भाजप कार्यालयात बसतात. पक्षासंबंधीची निष्ठा तसेच कुडाळच्या जनतेबद्दल काय भावना असतील, हे त्यांच्या वर्तवणूकीतून येते. एरवी भाजप विरुध्द पोस्ट टाकून सोशल मीडियावर भाजपची प्रतिमा मलीन करतात. केवळ अडचणीवेळी त्यांना भाजप पक्ष मित्र वाटतो का? असा प्रश्नही भोगटे यांनी उपस्थित केला.