वेंगुर्लेत ‘सागर सुरक्षा कवच’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वेंगुर्लेत ‘सागर सुरक्षा कवच’
वेंगुर्लेत ‘सागर सुरक्षा कवच’

वेंगुर्लेत ‘सागर सुरक्षा कवच’

sakal_logo
By

62624
वेंगुर्ले ः सागर सुरक्षा कवच मोहिमेत सहभागी पोलिस निरीक्षक अतुल जाधव आदी.

वेंगुर्लेत ‘सागर सुरक्षा कवच’
वेंगुर्ले ः सागरी किनारपट्टी सुरक्षेच्या दृष्टीने वेंगुर्लेत सी व्हिजन २०२२ अंतर्गत सागर सुरक्षा कवच मोहिम आज सकाळी सहा वाजल्यापासून राबविण्यात आली. रेडी किनारपट्टी ते हरिचरणगिरी किनारपट्टीपर्यंत ही मोहीम राबविण्यात आली. मानसीश्वर मंदिरसमोर मुख्य मार्गावर, रेडी चेक पोस्ट, मठ चेक पोस्ट आदी ठिकाणी नाकाबंदी करुन तपासणी करण्यात आली. या मोहिमेत उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी सोळंके, वेंगुर्ले पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांच्यासह अन्य ७ पोलिस अधिकारी, ३६ पोलीस अंमलदार, ३ होमगार्ड, १२ वॉर्डन, ५९ सागर रक्षक सदस्य, २२ एनसीसी कॅडेट, मेरिटाईम बोर्ड विभाग आदी सहभागी झाले होते. ही मोहीम उद्या (ता.१६) बुधवारी सायंकाळी आठपर्यंत राबविण्यात येणार आहे.