जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन २१ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्हास्तरीय महिला 
लोकशाही दिन २१ला
जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन २१ला

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन २१ला

sakal_logo
By

जिल्हास्तरीय महिला
लोकशाही दिन २१ला

सिंधुदुर्गनगरीत आयोजन, पिडीतांना आवाहन

सिंधुदुर्गनगरी, ता. १५ ः राज्यघटनेने प्रत्येकाला समान संधी, समान हक्क असे मूलभूत अधिकार दिले आहेत. समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, तसेच त्या तक्रारी-अडचणींचे निराकरण करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हास्तरावर दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी किंवा सार्वजनिक सुटी असल्यास त्यानंतर येणाऱ्या कामकाजाच्या दिवशी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन राबविण्यात येतो. नोव्हेंबरमधील जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन सोमवारी (ता.२१) जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात सकाळी अकरा ते दुपारी एक दरम्यान आयोजित केला आहे.
समस्याग्रस्त व पिडीत महिलांना न्याय मिळावा, या दृष्टीने महिलांच्या तक्रारी व अडचणींची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक होण्यासाठी महिला लोकशाही दिन हा उत्तम मार्ग आहे. समस्यग्रस्तांनी अडचणी मांडण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत, दालन क्र. १०६, ए-ब्लॉक, तळमजला, सिंधुदुर्गनगरी येथून घ्यावेत. अर्ज स्विकृतीचे निकष : अर्ज विहित नमुन्यात असावा, तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे असावे, तक्रार अर्ज दोन प्रतीत सादर करावा. अर्ज न स्विकृतीचे निकष : न्याय प्रविष्ठ प्रकरणे, विहित नमुन्यात नसणारे व आवश्यक ती कागदपत्रे न जोडलेले अर्ज, सेवा विषयक, आस्थापना विषयक बाबी, तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नसलेले अर्ज. समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी शासनाने उपलब्ध करुन दिलेल्या व्यासपीठाचा उपयोग आपल्या अडचणी सोडविण्यासाठी करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी केले आहे.