दीपक सावंत यांचा जामिन अर्ज फेटाळला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दीपक सावंत यांचा जामिन अर्ज फेटाळला
दीपक सावंत यांचा जामिन अर्ज फेटाळला

दीपक सावंत यांचा जामिन अर्ज फेटाळला

sakal_logo
By

दीपक सावंत यांचा
जामिन अर्ज फेटाळला
५ कोटी ८१ लाखाच्या अपहाराचा आरोप
दाभोळ, ता. १५ : दापोली नगरपंचायतीत शासकीय निधीचा अपहार केल्याचा गुन्हा दाखल असलेले तत्कालीन लेखापाल दीपक सावंत यांनी खेड येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला असून सावंत यांची रवानगी पुन्हा न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.
२०२१–२०२२ या आर्थिक वर्षात नगरपंचायतिच्या विविध बँक खात्यामधून ५ कोटी ८१ लाख १० हजार ३०९ इतक्या रकमेचा अपहार झाला असून त्यापैकी १ कोटी ३० लाख ४९ हजार २०८ इतकी रक्कम पुन्हा खात्यात जमा करण्यात आल्याने व याच काळात लेखापाल पदाची जबाबदारी दीपक सावंत यांचेकडे असल्याने व सावंत यांनी यासंदर्भात कोणताहि खुलासा न केल्याने सावंत यांचेविरोधात दापोली पोलीस ठाण्यात लेखापाल सिद्धेश खामकर यांनी अपहाराची केल्याची तक्रार दिली होती, या तक्रारीनुसार दीपक सावंत याचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता, काही दिवसांनी दीपक सावंत स्वत पोलीसांसमोर हजर झाला होता, चौकशी साठी सावंत यांना प्रथम पोलीस कोठडी देण्यात आली होती ती संपल्यावर १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली त्यानंतर दीपक सावंत यांचेवतीने खेड येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता, या अर्जावरील सुनावणीत सहाय्यक सरकारी वकील अँड. जाडकर यांनी जमीन देण्यास हरकत घेतली, सावंत यांनी केलेला हा गुन्हा आर्थिक स्वरूपाचा गुन्हा असून शासकीय पैशाचा त्यांनी अपहार केला आहे, या प्रकरणाचा तपास अजून सुरु असून त्यांना जामीन दिल्यास तपासात अडथळा निर्माण होईल असा युक्तीवाद न्यायालयात केला तो ग्राह्य मानून न्यायालयाने सावंत यांचा जमीन अर्ज फेटाळला आहे, आता जमिनासाठी सावंत यांना मुंबई उच्च न्यायालयात अर्ज करावा लागेल.