‘सागरी सुरक्षा कवच’ मोहीम मालवणात सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘सागरी सुरक्षा कवच’
मोहीम मालवणात सुरू
‘सागरी सुरक्षा कवच’ मोहीम मालवणात सुरू

‘सागरी सुरक्षा कवच’ मोहीम मालवणात सुरू

sakal_logo
By

62616
मालवण ः सागरी सुरक्षा कवच मोहिमेंतर्गत सुमद्रात गस्त घालताना संबंधित पथक.

‘सागरी सुरक्षा कवच’
मोहीम मालवणात सुरू
मालवण, ता. १५ : सागरी सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या सागरी सुरक्षा कवच मोहिमेस आज सकाळी सहापासून सुरुवात झाली. रेड टीम ब्ल्यू टीमचे सुरक्षा कवच भेदण्यासाठी, तर ब्ल्यू टीम त्यांना रोखण्यासाठी सज्ज झाले आहे. ही मोहीम उद्या (ता.१६) सायंकाळी सहापर्यंत सुरू राहणार आहे.
वर्षात दोन वेळा ही सागरी सुरक्षा कवच मोहीम राबविण्यात येते. या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर १० पोलिस अधिकारी, ४ तांत्रिक अधिकारी, ५ तांत्रिक अंमलदार, ५८ अंमलदार, ६ वॉर्डन, ९ गृहरक्षक दलाचे जवान, ९ एनसीसीचे विद्यार्थी, १९ सागर सुरक्षा दल सदस्य अशा एकूण १०७ जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. समुद्र किनारपट्टी भागात तसेच शहरातील मुख्य नाक्यांवर नाकाबंदी करत गाड्यांची तपासणी केली जात आहे. डोळ्यात तेल घालून कडा पहारा दिला जात आहे.