अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्षे रिक्त जागांसाठी प्रवेशफेरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्षे रिक्त जागांसाठी प्रवेशफेरी
अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्षे रिक्त जागांसाठी प्रवेशफेरी

अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्षे रिक्त जागांसाठी प्रवेशफेरी

sakal_logo
By

प्रथम वर्षे रिक्त जागांसाठी प्रवेश फेरी
रत्नागिरी, ता. १५ः शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेशाची रिक्त जागांकरिता प्रवेशफेरी घेण्यात येणार आहे. प्रवेशफेरीकरिता महाराष्ट्र राज्य सीईटी सेलच्या केंद्रभूत प्रवेशाकरिता (सीएपी) नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांनी आवश्यक त्या मुळ कागदपत्रासह व प्रवेशशुल्कासह १७ नोव्हेंबरला राउंड -१ व १९ नोव्हेंबरला राउंड -२ ला संस्थेत प्रत्यक्ष उपस्थित राहावे. सकाळ दहा ते दुपारी बारा या वेळात प्रवेशाचा अर्ज पूर्ण भरून व्यक्तिगतरित्या जमा करणे बंधनकारक राहील. गुणवत्ता यादी दुपारी १ वाजता लावण्यात येईल. प्रवेशप्रक्रिया दुपारी दोन वाजल्यापासून सुरू होईल. उशिराने येणाऱ्या अर्जाचा प्रवेशासाठी विचार केला जाणार नाही. प्रवेश इच्छुक सर्व उमेदवारांनी अधिक माहितीसाठी संस्थेच्या वेबपेजला www.gcoer.org भेट द्यावी, असे आवाहन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे करण्यात आले आहे.