टोलमाफी न मिळाल्यास टोलनाका बंद पाडणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टोलमाफी न मिळाल्यास 
टोलनाका बंद पाडणार
टोलमाफी न मिळाल्यास टोलनाका बंद पाडणार

टोलमाफी न मिळाल्यास टोलनाका बंद पाडणार

sakal_logo
By

टोलमाफी न मिळाल्यास
टोलनाका बंद पाडणार

नाईक ः ‘चाळकवाडी’च्या धर्तीवर मुक्ती द्या

कणकवली, ता.१६ : जिल्ह्यातील सर्वच वाहनांना ओसरगाव येथील टोल नाक्यावर कायमस्वरूपी टोलमाफी मिळाली पाहिजे. ही राष्ट्रवादी पक्षाची सुरुवातीपासूनची भूमिका आहे. पुणे - नाशिक रस्त्यावर चाळकवाडी टोलनाका येथे त्या भागातील सर्व वाहनांना टोलमाफी देण्यात आली आहे. त्याच धर्तीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओसरगाव टोलनाक्यावर संपूर्ण जिल्ह्यातील वाहनांना टोलमाफी मिळाली पाहिजे. अन्यथा जिल्ह्यातला टोलनाका सुरू होऊ देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते अबीद नाईक यांनी दिला.
श्री. नाईक यांनी म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात टोल वसुलीसाठी हालचाली जरी सुरू असल्या तरी टोलसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेचा पूर्णपणे विरोध आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला पूर्णपणे टोलमाफी मिळाली पाहिजे. ही भूमिका राष्ट्रवादीने यापूर्वीही वारंवार मांडली आहे. मात्र काही जणांकडून केवळ श्रेयासाठी स्टंटबाजी केली जात आहे; मात्र राष्ट्रवादी कोणत्याही स्थितीत टोल वसुली करू देणार नाही, अशी भूमिका श्री नाईक यांनी घेतली. तसेच टोल वसुली सुरू केल्यास राष्ट्रवादी रस्त्यावर उतरून टोल नाका बंद पाडेल असा इशारा देखील श्री नाईक यांनी दिला आहे.