सावंतवाडी शहरातील खड्डे बुजविले सावंतवाडी शहरातील खड्डे बुजविले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावंतवाडी शहरातील खड्डे बुजविले
सावंतवाडी शहरातील खड्डे बुजविले
सावंतवाडी शहरातील खड्डे बुजविले सावंतवाडी शहरातील खड्डे बुजविले

सावंतवाडी शहरातील खड्डे बुजविले सावंतवाडी शहरातील खड्डे बुजविले

sakal_logo
By

62737
सावंतवाडी ः येथील रस्त्यांवरील खड्डे बुजविताना संबंधित यंत्रणा.

सावंतवाडी शहरातील खड्डे बुजविले

पालिकेची मोहीम; शिवसेनेच्या इशाऱ्यानंतर जाग

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १६ ः शहरातील अंतर्गत रस्त्यांवर पडलेले खड्डे तत्काळ बुजविण्यात यावेत; अन्यथा घंटानाद आंदोलन करू, असा इशारा ठाकरे गटाचे पदाधिकारी शब्बीर मणियार यांनी दिला होता. त्यानुसार सावंतवाडी पालिकेने आजपासून रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे मणियार यांनी पालिका प्रशासनाचे आभार मानले.
नागरिकांना भेडसावणारे प्रश्न पालिका प्रशासनाने तत्काळ सोडवावेत, अशी मागणी ठाकरे गट शिवसेनेची होती. त्या पार्श्वभूमीवर शहरातील गटार स्वच्छता, डास निर्मूलन, मोकाट फिरणारी जनावरे यावर तोडगा काढून अंतर्गत रस्त्यांवरील पडलेले खड्डे तत्काळ बुजवण्यात यावेत, अशी मागणी मणियार यांनी केली होती. याबाबत पालिका प्रशासनाचे लक्ष वेधले होते; मात्र याकडे प्रशासन डोळेझाक करीत असल्यामुळे मणियार यांनी घंटानाद आंदोलनाचा इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतर पालिका प्रशासनाला जाग आली असून आजपासून खड्डे बुजविण्याची मोहीम हाती घेतली, असे मणियार यांनी सांगितले. पालिका प्रशासनाने अन्य प्रश्नांकडेही लक्ष द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.