ठाकरे शिवसेना अल्पसंख्याक सेल देवगड तालुकाप्रमुखांचे अभिनंदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाकरे शिवसेना अल्पसंख्याक सेल 
देवगड तालुकाप्रमुखांचे अभिनंदन
ठाकरे शिवसेना अल्पसंख्याक सेल देवगड तालुकाप्रमुखांचे अभिनंदन

ठाकरे शिवसेना अल्पसंख्याक सेल देवगड तालुकाप्रमुखांचे अभिनंदन

sakal_logo
By

६२८३१
देवगड ः कय्युम होलसेकर यांना नियुक्तीपत्र देताना मिलिंद साटम.

ठाकरे शिवसेना अल्पसंख्याक सेल
देवगड तालुकाप्रमुखांचे अभिनंदन
देवगड ः येथील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या अल्पसंख्याक सेलच्या देवगड तालुकाप्रमुखपदी कय्युम होलसेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष अब्दुल बटवाले यांनी त्यांना तसे नियुक्तीपत्र दिले आहे. आज येथील पक्षाच्या संपर्क कार्यालयात तालुकाप्रमुख मिलिंद साटम यांच्या हस्ते होलसेकर यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी माजी सभापती रवींद्र जोगल, देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा साक्षी प्रभू, नगरसेवक निवृत्ती उर्फ बुवा तारी, नगरसेवक नितीन बांदेकर आदी उपस्थित होते.
------
६२८२२
सिंधुदुर्गनगरी ः येथे पत्रकार दिनी उपस्थित मान्यवर.

राष्ट्रीय पत्रकार दिन उत्साहात
सिंधुदुर्गनगरी : प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाची स्थापना १६ नोव्हेंबर १९६६ मध्ये झाली. तेव्हापासून १६ नोव्हेंबर हा राष्ट्रीय पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त जिल्हा मुख्यालय पत्रकार संघ व जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने वृत्तपत्र सृष्टीचे आद्यजनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मुख्यालय पत्रकार समितीचे अध्यक्ष संजय वालावलकर, जिल्हा माहिती कार्यालयाचे माहिती सहायक रणजित पवार, बाळ खडपकर, संदीप गावडे, दत्तप्रसाद वालावलकर, विनोद दळवी, गिरिष परब, नंदकुमार आयरे, विनोद परब, देवयानी वरसकर आदी उपस्थित होते.

६२७६०
मालवण ः बख्तियार खान यांचा सत्कार करताना गवाणकर, पावसकर.

बख्तियार खान यांना ‘एमडीआरटी’
मालवण : एलआयसी मालवण शाखेतील बख्तियार खान यांना २०२२ या वर्षातील पहिला ‘एमडीआरटी’ होण्याचा बहुमान प्राप्त झाला आहे. यानिमित्त खान यांचा येथील शाखेच्या वतीने शाखा प्रबंधक सुहास गव्हाणकर व विकास अधिकारी शैलेश पावसकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. खान हे गेली २० वर्षे ग्राहकांना योग्य विमा सल्ला व तत्पर सेवा देत आहेत. त्यांना शाखा प्रबंधक सुहास गव्हाणकर, विकास अधिकारी शैलेश पावसकर यांचे मार्गदर्शन लाभले.
............
६२७३३
चिन्मय मराठे

चिन्मय मराठे बुद्धिबळात प्रथम
वेंगुर्ले ः क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा परिषद व क्रीडा अधिकारी, सिधुदुर्ग यांच्यावतीने आयोजित वेंगुर्ले तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा सोमवारी (ता. १४) पार पडली. यात सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूलचा दहावीमधील विद्यार्थी चिन्मय मराठे याने प्रथम क्रमांक पटकावला. त्याची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशाबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष इर्शाद शेख, संचालक प्रशांत नेरुरकर, सेक्रेटरी दत्तात्रय परुळेकर, मुख्याध्यापिका मनीषा डिसोजा तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्याचे अभिनंदन केले.
--
‘कृषी स्वावलंबन’बाबत आवाहन
वेंगुर्ले ः अनुसूचित जाती, नवबौध्द शेतकऱ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना कार्यान्वित आहे. या योजनेंतर्गत तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन पंचायत समिती वेंगुर्लेचे गटविकास अधिकारी विद्याधर सुतार यांनी केले आहे. आधारकार्ड व आधार लिंक केलेल्या बँक पासबुकची प्रत, २०२१-२२ चा १.५० लाखाच्या आत उत्पन्नाबाबत तहसीलदारांचा दाखला अर्जासोबत आवश्यक आहे. महिला व अपंग लाभार्थ्यांना निवडीत प्राधान्य राहणार आहे. अधिक माहितीसाठी पंचायत समिती वेंगुर्ले कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
--
वेंगुर्लेत उद्या सहकार मेळावा
वेंगुर्ले ः राज्यात तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात १४ ते २० नोव्हेंबर या कालावधीत सहकार सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहानिमित्त शुक्रवारी (ता. १८) सकाळी अकराला महिला काथ्या कामगार औद्योगिक सहकारी संस्था वेंगुर्ले येथे सहकार मेळाव्याचे आयोजन केले आहे. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा सहकार मंडळाचे अध्यक्ष गजानन सावंत, ज्येष्ठ नेते एम. के. गावडे तसेच सहकार क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. सर्व सहकार प्रेमी, विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन महिला काथ्या संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका प्रज्ञा परब यांनी केले आहे.