विलवडेवासीयांच्या आपुलकीमुळेच यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विलवडेवासीयांच्या आपुलकीमुळेच यश
विलवडेवासीयांच्या आपुलकीमुळेच यश

विलवडेवासीयांच्या आपुलकीमुळेच यश

sakal_logo
By

62730
विलवडे ः आबा दळवी, सीता दळवी यांचा सन्मान करताना बाळकृष्ण दळवी. शेजारी अन्य.

विलवडेवासीयांच्या आपुलकीमुळेच यश

आबा दळवी ः देवस्थान कमिटीतर्फे जत्रोत्सवात सत्कार

ओटवणे, ता. १६ ः ‘‘विलवडे गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊलीचा कृपाशीर्वाद आणि माझ्या जन्मभूमीतील माणसांकडून मिळत असलेले प्रेम यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठ्या पदांना न्याय देऊ शकलो. गावातील लोकांच्या आपुलकीमुळे वेळोवेळी काहीतरी नवीन करण्याची इच्छा होते आणि ती कायम राहील,’’ अशा भावना विलवडेचे सुपुत्र तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी रामचंद्र ऊर्फ आबा दळवी यांनी व्यक्त केल्या.
विलवडे माऊली मंदिरात वार्षिक जत्रोत्सवानिमित्त आबा दळवी व सीता दळवी या उभयतांचा देवस्थान कमिटीतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी देवस्थान कमिटी अध्यक्ष बाळकृष्ण दळवी, शिवसेना मिरा भाईंदर जिल्हा उपविभाग प्रमुख विष्णू देऊलकर, माजी उपसरपंच प्रकाश दळवी, शेतीनिष्ठ पुरस्कार विजेते प्रमोद दळवी, प्रगतशील युवा शेतकरी कालिदास दळवी, देवस्थान कमिटीचे विनायक दळवी, सुरेश सावंत, महेंद्र दळवी आदी उपस्थित होते.
श्री देवी माऊली मंदिर बांधकामाचा सर्वस्वी भार स्वीकारून गावातील वातावरण भक्तिमय आणि आनंदमय करण्याची भूमिका आबा दळवी यांनी निभावली आहे. या कार्यासाठी त्यांनी २५ लाख रुपयांची देणगी दिली. यानिमित्त ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले. दळवी यांची गरीब आणि ज्येष्ठ नागरिकांचा आधारस्तंभ अशी राज्यात ख्याती आहे. विलवडेच्या विकासासाठी प्रयत्न करून त्यांनी माणुसकीचा वारसा जपला आहे. २०२१ मध्ये तेरेखोल नदीच्या पुराचे पाणी भरवस्तीत शिरून नुकसान झालेल्या विलवडेवासीयांना दोन लाख ९५ हजार रुपयांची मदत केली होती. क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात विद्यार्थी, तरुण वर्गाला संधी मिळण्यासाठी त्यांनी विविध उपक्रमांत आर्थिक सहकार्य दिले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत विलवडेवासीयांनी त्यांचा सन्मान केला. मुंबई येथे महिला सक्षमीकरणासाठी कार्यरत असणाऱ्या सीता दळवी यांनी गावाकडून मिळणाऱ्या प्रेमाचे कौतुक केले.