त्रिमूर्ती संगीत विद्यालयाचे ‘टीचर्स ट्रेनिंग’मध्ये यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

त्रिमूर्ती संगीत विद्यालयाचे
‘टीचर्स ट्रेनिंग’मध्ये यश
त्रिमूर्ती संगीत विद्यालयाचे ‘टीचर्स ट्रेनिंग’मध्ये यश

त्रिमूर्ती संगीत विद्यालयाचे ‘टीचर्स ट्रेनिंग’मध्ये यश

sakal_logo
By

62735
कुडाळ ः श्री त्रिमूर्ती संगीत विद्यालयाचे यशस्वी विद्यार्थी.

त्रिमूर्ती संगीत विद्यालयाचे
‘टीचर्स ट्रेनिंग’मध्ये यश
कुडाळ, ता. १६ ः टीचर्स ट्रेनिंग सर्टिफिकेट कोर्समध्ये येथील श्री त्रिमूर्ती संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळविले.
जनशिक्षण संस्था रायगड आणि श्री समर्थ शारदा सुगम संगीत संस्था कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने भारत सरकारच्या उपक्रमातून टीचर्स ट्रेनिंग सर्टिफिकेट कोर्स (टीटीसीसी) पुणे-कोथरूड येथे सात दिवसांचा निवासी कोर्स घेण्यात आला.
यामध्ये धृवा नेमळेकर, गायत्री सोनुर्लेकर, शिवम धरणे यांनी हा अभ्यासक्रम पूर्ण केला. या परीक्षेत त्यांना प्रथम श्रेणी मिळाली. याबाबत अध्यक्ष राजाराम गव्हाणकर, उपाध्यक्ष भास्कर गुंजाळ, सचिव विजय मेस्त्री यांनी सर्वांचे अभिनंदन केले. या अभ्यासक्रमामुळे यशस्वी विद्यार्थी विद्यालयामार्फत होणाऱ्या सुगम संगीत परीक्षांमध्ये परीक्षक म्हणून काम करू शकणार आहेत. मार्चमध्ये घेण्यात झालेल्या एसएससी बोर्डाच्या परीक्षेत विद्यालयामार्फत सुगम संगीत अभ्यासक्रम पूर्ण करून परीक्षा देणाऱ्या पाच विद्यार्थ्यांना कला विषयाचे वाढीव गुण मिळाले आहेत. या वाढीव गुणांचा भविष्यात‌ही दहावीच्या विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन गव्हाणकर यांनी केले आहे. एसएससी बोर्डाचे वाढीव गुणदान करण्यास मान्यता असलेले क्रीडा व सांस्कृतिक विभाग पुणे यांच्याकडे नोंदविलेले जिल्ह्यातील श्री त्रिमूर्ती संगीत विद्यालय माणगाव हे एकमेव विद्यालय आहे.