भोसले पॉलिटेक्निकमध्ये ‘बिल्डिंग मेंटेनन्स’चे धडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भोसले पॉलिटेक्निकमध्ये
‘बिल्डिंग मेंटेनन्स’चे धडे
भोसले पॉलिटेक्निकमध्ये ‘बिल्डिंग मेंटेनन्स’चे धडे

भोसले पॉलिटेक्निकमध्ये ‘बिल्डिंग मेंटेनन्स’चे धडे

sakal_logo
By

62736
सावंतवाडी ः भोसले पॉलिटेक्निक येथे ‘कंटिन्युअस एज्युकेशन प्रोग्राम’अंतर्गत प्रशिक्षण देताना संबंधित.

भोसले पॉलिटेक्निकमध्ये
‘बिल्डिंग मेंटेनन्स’चे धडे

सावंतवाडी, ता. १६ ः येथील यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक येथे ‘कंटिन्युअस एज्युकेशन प्रोग्रॅम’ (सीईपी) अंतर्गत एकदिवसीय प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षण वर्गात येथील आरपीडी ज्युनिअर कॉलेजच्या बिल्डिंग मेंटेनन्स या व्यावसायिक अभ्यासक्रमाचे विद्यार्थी सहभागी झाले होते.
या वर्गाचे उद्‍घाटन संस्थेचे सचिव संजीव देसाई यांच्या हस्ते झाले. यावेळी ‘आरपीडी’चे प्रा. नवनाथ सावंत, जनसंपर्क अधिकारी नितीन सांडये, सिव्हिल विभागाचे प्रा. प्रसाद मणेरीकर, प्रा. हवाबी शेख उपस्थित होते. दिवसभर चाललेल्या या प्रशिक्षण सत्रात विद्यार्थ्यांना सर्व्हे, काँक्रीट टेक्नॉलॉजी, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन, बिल्डिंग प्लॅनिंग अँड डिझाईन, इस्टिमेटिंग अँड कॉस्टिंग यासोबतच मटेरियल टेस्टिंग लॅब आदी विषयांची प्रात्यक्षिके दाखविली. प्रशिक्षण वर्गात २७ विद्यार्थी सहभागी झाले. बांधकाम क्षेत्रातील महत्त्वपूर्ण विषयांची प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांना अनुभवता आल्यामुळे त्यांच्या ज्ञानात चांगली भर पडेल, असा विश्वास प्रा. सावंत यांनी वर्गाच्या समारोपप्रसंगी व्यक्त केला. तसेच सिव्हिल विभागाच्या सहकार्याबद्दल आभार मानले.