शिकावी कला जाहिरातीची | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिकावी कला जाहिरातीची
शिकावी कला जाहिरातीची

शिकावी कला जाहिरातीची

sakal_logo
By

( टुडे पान ४ साठी, सदर)
(टीप- इंग्रजी शब्द आहेत.)

धरू कास उद्योगाची............लोगो

फोटो ओळी
rat१६p६.jpg ः

६२७१६

प्रसाद जोग

इंट्रो
सोशल मीडिया ग्रुपचा वापर करून जाहिरात करत असताना योग्य असा मंच मिळेलच याची शाश्वती नसते. हीच संधी हेरून सर्व प्रकारच्या जाहिरातीचे काम या जाहिरात घरांनी करावे. साबणापासून नेलपॉलिशपर्यंत आणि कपड्यापासून ते मोटारीपर्यंत सगळ्याच गोष्टींची जाहिरात होते. जाहिरात केल्याशिवाय कोणत्याही गोष्टींची विक्री होत नाही, असे आजचे चित्र आहे. यामुळे ''आकर्षक जाहिरात'' बनवून देणाऱ्या संस्थांनाच विशेष महत्व प्राप्त झालं आहे. मुंबई-पुणेसारख्या शहरातून जाहिरात निर्मिती संस्था मोठ्या प्रमाणात दिसून येतात; पण अजूनही advertising agency ही संकल्पना कोकणात रुजलेली दिसून येत नाही. याचा फायदा कोकणातील नवउद्योजकांनी जरूर उचलावा.

- प्रसाद जोग, चिपळूण

शिकावी कला जाहिरातीची, मोठी व्याप्ती या उद्योगाची

जाहिरात करणे या क्रियापदाचा अर्थ होतो जाहीर करणे, प्रकटन करणे. जाहिरात ही वस्तू आणि सेवांबद्दल विविध माध्यमातून (मीडिया) माहिती संप्रेषित करण्याची प्रक्रिया होय. जाहिरात ही व्यावसायिकदृष्ट्या केली जाते. जाहिरात हे जाहिरातदार व ग्राहक यातील हक्काचे संवादाचे माध्यम असते. ते परिणामकारक झाले तर जाहिरातीची उद्दिष्टे पूर्ण होऊ शकतात.
जाहिरातींची उद्दिष्टे
१. ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी
२. उत्पादनांची, सेवांची, स्कीम्सची माहिती प्रदान करण्यासाठी
३. आपल्या लक्षित व अपेक्षित ग्राहकवर्गामध्ये खरेदीवृत्ती तयार करणे किंवा ती अधिक मजबूत करणे
४. ग्राहकांमध्ये गैरसमजामुळे किंवा अपप्रचारामुळे जर नकारात्मक धारणा, भावना रुजली असेल तर ती दुरुस्त करण्यासाठी
५. ब्रँड प्रतिमा विकसित करण्यासाठी
६. ग्राहकांचे लक्ष, मन, चित्त आपल्याच ब्रँडकडे आकर्षून घेण्यासाठी
७. ग्राहकांना शिक्षित करण्यासाठी
८. प्रतिस्पर्ध्यांच्या दाव्यांचा सामना करण्यासाठी
९. ब्रँड लॉयल्टी विकसित करण्यासाठी
१०. निर्धारित बाजारपेठेचा योजनाबद्ध विस्तार करण्यासाठी
११. स्पर्धात्मक बाजारपेठेत योग्य ते स्थान मिळवण्यासाठी ... इत्यादी
सध्याचे युग हे जाहिरातीचे युग आहे. ''जाहिरात'' हे आजच्या जागतिकीकरणाच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठीचे महत्वाचे साधन आहे. आजकाल छोट्या उद्योजकापासून मोठ्या उद्योजकापर्यंत सर्वांनाच हे टूल वापरण्याचा मोह होतो व ते अनिवार्यही आहे. आधुनिक व्यापारी जगात जाहिरातीला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालेले दिसून येते. जाहिरातीने प्रभावित होऊन लोकांनी जाहिरातदाराची वस्तू किंवा सेवा घेणे
हा जाहिरातीचा मुख्य उद्देश असतो. आजच्या corporate जगतात व्यावहारिक, व्यावसायिक, नावीन्यपूर्ण, सृजनशील, आकर्षक, चित्तवेधक जाहिराती करू शकणाऱ्या व ग्राहकाचे समाधान करून देऊ शकणाऱ्या जाहिरात agency ना मानाचे स्थान आहे.
कोकणात फक्त हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच लोकप्रिय जाहिरात संस्था आहेत. नुसतं डीटीपी सेंटर चालवणं किंवा फ्रीलान्सिंग कॅन्व्हासर म्हणून काम करणं हे जरी पर्याय असले तरी व्हिजन ब्रॉड असेल तर कोकणात हाच व्यवसाय वेगळ्या पद्धतीने करता येऊ शकतो.
कोकणात बाजारपेठेजवळ असणारे पुरेसे पार्किंग असणारे एखादे जुने घर भाड्याने घेऊन किंवा विकत घेऊन जाहिरात घर सुरू करावे. या जाहिरात घरात डिझायनिंग, प्रिंटिंग, बाईडिंग, वृत्तपत्रात छापून आणायच्या जाहिराती या सर्व सेवा ग्राहकाला एका छताखाली देण्याचा प्रयत्न करावा. ग्राहक आपल्या इथे जास्तवेळ बसावेत म्हणून त्यांच्यासाठी तिथेच चहा, कॉफी, रिफ्रेशमेंट देण्याचा प्रयत्न करावा. जाहिरातविषयक साहित्य तेथे वाचावयास ठेवावे. पर्यटक, फॉरेनर यांच्यासाठी त्याच घरामध्ये ते घेऊन आलेल्या फोटोची टीशर्ट प्रिंटिंगची सोय करावी.
''जाहिरात घर'' याच नावाने ब्रॅण्ड करण्याचा प्रयत्न करावा. यात आर्ट्स, management च्या विद्यार्थ्याना इंटर्नसाठी घ्यावे.
ब्रॅण्ड म्हणजे व्यवसायाची ओळख. हीच ओळख निर्मिती प्रत्येक उद्योग व्यवसायाची जाहिरात घरांद्वारे केली जाऊ शकेल. अशाप्रकारे प्रयत्नशील राहावे. उद्योगप्रक्रियेत प्रत्येक आस्थापनांची स्वतःची अशी तत्त्वे व कार्यपद्धती असते. व्यवसायवृद्धीसाठी ''कशी व कुठे'' जाहिरात करावी हा सर्वस्वी उद्योजकाचा निर्णय असतो. मार्केटमध्ये गुडविल निर्माण करण्यासाठी, मालाची अथवा सेवांची जाहिरात व विक्री, प्रमोशन करण्यासाठी, माउथ पब्लीसिटीसाठी, Branding साठी विविध माध्यमातून जाहिराती केल्या जातात. corporate पासून छोट्या उद्योजकांसाठी जाहिरात तयार करण्याचे, जाहिरात execute करण्याचे व समग्र जाहिरात व्यवस्थापनाचे काम जाहिरात agency कडून केले जाते. जाहिरातीचं हे विश्व दिवसेंदिवस अधिकाधिक व्यापक व समृद्ध होत जाणार आहे; पण सर्व व्यावसायिकांना जाहिरातीसाठी वेगळे असे बजेट ठेवता येत नाही. त्यासाठी जाहिरात घरांकडून विविध पर्याय ग्राहकांना देण्यात यावेत.
काळानुसार जाहिरातशैलीत बदल होत असतात व ते अपेक्षितही असतात. कारण, काळानुसार ग्राहकांची व समाजाचीही अभिरुची व आवड बदलत असते. जाहिरातीमधून ग्राहकांच्या गरजांचा व मानसिकतेचा तसेच त्यांच्या क्रयशक्तीचा विचार होणे ही आवश्यक असते. जाहिरातीमुळेच संभाव्य ग्राहक पटकन convince होऊ शकतो. म्हणूनच जाहिरातीतील महत्वाचे अंग म्हणजे जाहिरातीचे पोझिशनिंग. जाहिरातीतून लोकांना आकर्षित करून घेण्यासाठी ''प्रतिमानिर्मिती'' तंत्राचाही वापर जाहिरात घरातून केला जाऊ शकतो.