उच्च शिक्षित युवकांची राजकारणात गरज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उच्च शिक्षित युवकांची राजकारणात गरज
उच्च शिक्षित युवकांची राजकारणात गरज

उच्च शिक्षित युवकांची राजकारणात गरज

sakal_logo
By

(टुडे पान ४ साठी)

फोटो ओळी
- rat१६p२.jpg-
६२६७९
रत्नागिरी ः ठाकरे युवासेनेच्या कॉलेज युनिट उद्घाटनप्रसंगी आमदार राजन साळवी, प्रसाद सावंत यांच्यासह अन्य पदाधिकारी व युवक.


उच्च शिक्षित युवकांची राजकारणात गरज

उपनेते राजन साळवी ; युवासेनेच्या कॉलेज युनिटचे उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा ः
रत्नागिरी, ता. १६ ः उच्चशिक्षित युवकांची आज राजकारणात गरज आहे. ही पोकळी युवासेनेच्या माध्यमातून उभारलेल्या या कॉलेज युनिटच्या तरुण सभासद नक्कीच भरून काढतील, अशी अपेक्षा शिवसेनेचे उपनेते आमदार राजन साळवी यांनी व्यक्त केली.
शहरातील अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महविद्यालय आणि गोगटे-जोगळेकर वरिष्ठ महाविद्यालय, शासकीय तंत्रनिकेतन येथे युवासेना कॉलेज युनिटच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. युवासेना जिल्हा युवा अधिकारी विनय गांगण, जिल्हा समन्वयक दुर्गेश साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तालुका युवाधिकारी प्रसाद सावंत यांच्या नेतृत्वाखाली ही युनिट रत्नागिरीत सुरू करण्यात आली आहेत. या प्रसंगी आमदार साळवी म्हणाले, भविष्यात आपणास ज्या काही अडचणी येतील त्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. उच्च शिक्षण घेऊन आपल्या आई-वडिलांचे स्वप्न साकार करा. उच्चशिक्षित युवकांची राजकारणात गरज आहे, ती पोकळी तुम्ही नक्कीच भरून काढाल तसेच नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनाही पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा असून त्यांनी जोमाने काम करा.
कार्यक्रमावेळी दुर्गेश साळवी, प्रसाद सावंत यांच्यासह उपतालुका युवा अधिकारी देवेंद्र अडके, शहर युवा अधिकारी आशिष चव्हाण, उपशहर युवा अधिकारी पारस पाटील, दीक्षांत मयेकर, खेडशी उपविभाग अधिकारी रोहित पिंपळे आदी उपस्थित होते. या प्रसंगी युनिट पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली. अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महविद्यालय आणि गोगटे-जोगळेकर वरिष्ठ महाविद्यालय युनिट ः तरुण शिवलकर (अध्यक्ष, कनिष्ठ महविद्यालय), स्वराज साळुंखे (वरिष्ठ महाविद्यालय), उपाध्यक्ष ः शार्दुल गावणकर (कनिष्ठ महविद्यालय), साहिल कांबळे (वरिष्ठ महाविद्यालय), सचिव ः अय्यान झारी (कनिष्ठ महविद्यालय), जयदीप सावंत (वरिष्ठ महाविद्यालय), सहसचिव ः हितेश बिर्जे (कनिष्ठ महविद्यालय), रोहित शिंदे (वरिष्ठ महाविद्यालय). सदस्य ः ओम सावंत, हृषिकेश ठाकूर, ओवेस वाघू, रेहान खलिफे, नितीन खोदिया, अमन खोदिया, अमन राणे, अजिंक्य कांबळी, अनुराग राणे, सोहम निवळकर, आयुष मोहिते, गुरूप्रसाद कोतवडेकर. शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय ः बालाजी कसबे (अध्यक्ष), प्रसाद बंडबे, योगेंद्र जोईल (उपाध्यक्ष), इब्राहिम अन्सारी (सचिव), तेजस महाडिक (सह सचिव), सदस्य ः अथर्व गांगण, सोहम साळवी, कानिफ आंब्रे, जय परब, तरंग मांडवकर, हर्ष शेट्ये, प्रणित सुर्वे, वेदांत गोखले, अथर्व बने, ललित बंदरकर, अथर्व सुर्वे, नरेंद्र महाडिक, चिन्मय सावंतदेसाई, स्वयम नागवेकर, इंद्रनील जुवेकर, जुनेद शेख, अमन हुनेरकर, आदिल म्हसकर, सचिन मेठा, स्वयम शिंदे, सुशांत नागवेकर, परशुराम बरगुलकर, रूणाल सावंत, नरेश राठोड, ओम माने.