गडकिल्ले तीर्थक्षेत्रच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गडकिल्ले तीर्थक्षेत्रच
गडकिल्ले तीर्थक्षेत्रच

गडकिल्ले तीर्थक्षेत्रच

sakal_logo
By

(टुडे पान ४ साठी मेन)

फोटो ओळी
-rat१५p१५f.jpg-
६२४३९
रत्नागिरी ः एनसीसीच्या कोकण सारथी नौकाभ्रमण मोहिमेला मंगळवारपासून सुरवात झाली. नौका वल्हवत नेताना एनसीसी छात्र.

महाराष्ट्रातील गडकिल्ले जणू तीर्थक्षेत्रेच

मेजर जनरल वाय. पी खंडुरी; किल्ले रक्षणाचे देणार प्रशिक्षण

सकाळ वृत्तसेवा ः
रत्नागिरी, ता. १५ ः छत्रपती शिवाजी महाराजांची ही कर्मभूमी आहे. महाराजांनी स्वराज्यासाठी संपूर्ण आयुष्य वेचले. याच महाराष्ट्राच्या भूमीत मला एनसीसी नेतृत्वाची संधी मिळाली. महाराजांनी बांधलेले व किनाऱ्यावरील गडकिल्ले हे तीर्थक्षेत्र आहेत. भारतावर जी आक्रमणे झाली ती समुद्री मार्गाने झाली, त्यामुळे एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी किनारपट्टी आणि किल्ल्यांचे रक्षण केले पाहिजे याचेही प्रशिक्षण द्यायचे आहे, असे प्रतिपादन मेजर जनरल, एडीजी, एनसीसी डायरेक्टर वाय. पी. खंडुरी यांनी केले.
भगवती बंदर येथे २ (सेकंड) महाराष्ट्र एनसीसी नेव्हल युनिटतर्फे कोकण सारथी या महत्वाकांक्षी मोहिमेचे उद्घाटनानंतर ते बोलत होते. ते म्हणाले, गतवर्षी या सागरी मोहिमेला विजेतेपद मिळाले होते. याही वर्षी जेतेपद पटकावू. यात जोश व हिंमतीने एनसीसी छात्र भाग घेत आहेत. भविष्य उज्ज्वल आहे. ज्या संस्थांनी मदत केली त्यांचे आणि कोस्टगार्ड, अल्ट्राटेक, पोलिस, प्रशासन यांचेही आभार. एनसीसी एकता व शिस्त शिकवते. बागेत एकाच प्रकारची फुले असली तर त्याची शोभा नाही तर विविध प्रकारची फुले असली तर वेगळेपणा दिसतो. भारतात वेगवेगळ्या भाषा, संस्कृतीचे लोक आहेत. त्यात एकता आहे. भारत जगात पुढे चालला आहे. एकता नाही तिथे संकटे येतात आणि शांतता नांदत नाही. शिस्त स्वतःमध्ये भिनली पाहिजे. तुमची शिस्त पाहून लोकही प्रेरणा घेतील. तुम्ही छोटे दिवे असून तुम्ही अनेक भाग प्रकाशमय करताय.
कार्यक्रमाला डीडीजी एनसीसी डायरेक्टर ब्रिगेडियर सुबोजित लाहिरी, डायरेक्टर कमांडर सत्पाल सिंग, एनसीसी ग्रुप हेडक्वार्टर कोल्हापूरचे ब्रिगेडियर समीर साळुंखे, २ महा. नेव्हल युनिटचे कमांडिंग ऑफिसर के. राजेशकुमार, अल्ट्राटेकचे युनिट हेड डी. ए. चंद्रशेखर, कोस्टगार्डचे सीओ श्रीनिवास गडाम, कोस्टगार्डचे डीआयजी शत्रूजित सिंग, मत्स्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आशिष मोहिते, अग्निशमन दलाचे ए. डी. राऊत आदी उपस्थित होते.
शिडाच्या तीन नौकांमधून पुलिंग व सेलिंग करत एनसीसीचे ६० छात्र सहभागी झाले आहेत. दररोज एका बंदरात वस्ती करून एकूण १० बंदरांना भेट देणार आहेत. बंदरानजीकच्या लोकवस्तीमध्ये पथनाट्ये सादर करून किनारपट्टीच्या भागातील लोकांचे प्रबोधन करणार आहेत. समुद्रात १७७ नॉटिकल मैल अंतर पार केले जाणार आहे. एनसीसी अधिकारी, नौका, सुरक्षा बोट, मदतनौका, भारतीय हवामान खाते, नेव्ही, कोस्टगार्डचे सहकार्य या प्रसंगी मिळणार आहे. तसेच खारफुटीचे संरक्षण, संवर्धन करण्याबाबतही संदेश देणार आहेत.


शिस्त, समन्वय महत्वाचा
एनसीसी डायरेक्टर वाय. पी. खंडुरी म्हणाले की, हाताची पाचही बोटे वेगवेगळी असतात; पण पंजा ताकदीने असेल तर आपण चांगले काम करू शकतो. प्रत्येकाने आपापले काम करावे. त्यात समन्वय असला पाहिजे. समाजात प्रत्येकजण काम करत असतो. डॉक्टर, वकील, उद्योजक, स्वच्छता कर्मचारी आहेत. कोणत्याही कामाला कमी लेखू नका. शत्रूला पराजित करण्यासाठी एकता व शिस्त, समन्वय हवा. अनेकजण भारतीय सैन्यात जायचे आहे, असे सांगतात; पण कोणाला जाता आले नाही तर प्रत्येकाने स्वतःचे काम चांगल्या पद्धतीने, प्रामाणिकपणे केले तर ती देशसेवाच आहे. मच्छीमार, शेतकरी, उद्योजक, शिक्षक हे सुद्धा देशाची सेवा करत आहेत.