नडगिवे इंग्लिश स्कूलमध्ये बालदिन उत्साहात साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नडगिवे इंग्लिश स्कूलमध्ये 
बालदिन उत्साहात साजरा
नडगिवे इंग्लिश स्कूलमध्ये बालदिन उत्साहात साजरा

नडगिवे इंग्लिश स्कूलमध्ये बालदिन उत्साहात साजरा

sakal_logo
By

62778
नडगिवे ः बालदिन कार्यक्रमात मनोगत मांडताना सृष्टी कोवळे. (छायाचित्र : एन. पावसकर)

नडगिवे इंग्लिश स्कूलमध्ये
बालदिन उत्साहात साजरा
तळेरे, ता. १६ : नडगिवे येथील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये बालदिन अर्थात ‘चिल्ड्रन्स डे’ उत्साहात साजरा झाला. यानिमित्ताने आयोजित विविध उपक्रमांचा विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद लुटला.
मुख्याध्यापक सरदार निकम यांच्या हस्ते दीपपूजन व पं. नेहरूंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्यांना सुशिक्षित, सुसंस्कृत आणि पं. नेहरूंप्रमाणे प्रेमभाव आत्मसात करण्याचे आवाहन केले. दुसरीची सृष्टी कावळे हिने पं. नेहरूंच्याबाबत भाषण केले. शिक्षकेतर कर्मचारी अनिल कर्ले यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा अभिव्यक्त केल्या. यावेळी शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश प्राप्त केलेल्या महविष मुल्ला, राधिका पांचाळ, स्वरा सावंत, हादिया सारंग, जोया पटेल, आयेशा पटेल यां मुख्याध्यापक निकम तसेच सहशिक्षक आर. एस्. पांडेय यांच्या हस्ते प्रशस्तिपत्रके देऊन गौरव करण्यात आला. विविध खेळ, नृत्ये, गाणी, वक्तृत्व, चित्रकला आदी उपक्रम झाले. आदर्श एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मनोज गुळेकर यांनी बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या. सहशिक्षक ओंकार गाडगीळ यांनी आभार मानले.