रत्नागिरीकरांनो खचू नका; पुन्हा संधी मिळतेय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरीकरांनो खचू नका; पुन्हा संधी मिळतेय
रत्नागिरीकरांनो खचू नका; पुन्हा संधी मिळतेय

रत्नागिरीकरांनो खचू नका; पुन्हा संधी मिळतेय

sakal_logo
By

(टुडे पान १ साठी)

फोटो ओळी
-rat१६p३.jpg-
६२६८०
रत्नागिरी ः जिल्हा कार्यकारिणीप्रसंगी मार्गदर्शन करताना नेते भास्कर जाधव.

रत्नागिरीकरांनो खचू नका; पुन्हा संधी मिळतेय

भास्कर जाधव ; ग्रामपंचायत उमेदवार ठरवताना चर्चा करा
सकाळ वृत्तसेवा ः
रत्नागिरी, ता. १६ ः रत्नागिरी मतदार संघात पूर्वी शिवसेनेच्या चिन्हावर आमदार निवडून येत नव्हता, भाजपचा होता. येथे शिवसेनेचा आमदार असावा, अशी रत्नागिरीतील प्रत्येकाची इच्छा होती. ती संधी २०१४ ला शिवसैनिकांना मिळाली आणि स्वबळावर उमेदवार निवडूनही आला. आता पुन्हा तीच संधी शिवसैनिकांना मिळणार आहे. तेव्हा जो उमेदवार पक्ष देईल त्याच्यामागे उभे राहण्याची वेळ आली आहे. तेव्हा रत्नागिरीकरांनो खचून जाऊ नका, असे आवाहन उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी केले.
शहरातील साळवी स्टॉप येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या जिल्हा कार्यकारिणीत मार्गदर्शन करताना आमदार जाधव बोलत होते. या वेळी खासदार विनायक राऊत, माजी मंत्री रवींद्र माने, संपर्क नेते सुधीर मोरे, सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हाप्रमुख विलास चाळके, तालुकाप्रमुख बंड्या साळवी, प्रमोद शेरे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. आमदार जाधव यांनी या प्रसंगी रोहन बनेंसह अन्य नावे घेत नवीन पिढी राजकारणात सक्रिय होण्यासाठी सज्ज झाल्याचे जाहीर केले. त्यांनी आता पक्षाची धुरा खांद्यावर घेऊन पुढे जावे, असे आवाहनही सर्वांना केले. ते म्हणाले, रत्नागिरीत चर्चा चालू आहे की, आता पैसा भारी झाला आहे. त्याला तुम्ही घाबरून जाऊ नका. सगळीकडे पैसाच चालतो असे नाही. २०१४ ला शिवसेना-भाजप युती नव्हती तरीही भाजप सोबत नसतानाही रत्नागिरी विधानसभा मतदार संघात शिवसेनेने एकट्या बळावर भगवा फडकवला. तेव्हा शिवसैनिकांनी आपली ताकद सिद्ध करून दाखवली आहे. ती संधी पुन्हा चालून आली आहे. घाबरून जाण्याचे कारण नाही. भाजपवालेही तुम्हाला मदत करतील. त्यांनाही आताचे निवडून आलेले उमेदवार नको आहेत. तेव्हा सदस्य नोंदणीसाठी सर्वांनी जोरदार कामाला लागा, असे आवाहन त्यांनी केले.


सर्वांना विश्‍वासात घेऊन उमेदवार ठरवा

ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. यामध्ये उमेदवार ठरवताना सर्वांना विश्‍वासात घेतले पाहिजे. गावपातळीवर एकत्रित बसून उमेदवार ठरवा. गुहागरमध्ये हा फंडा आम्ही यशस्वी करत आहोत, असे आवाहन नेते आमदार जाधव यांनी केले.