कातळशिल्प शोध ही पुरातत्वीयदृष्ट्या शतकातील महत्वपूर्ण घटना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कातळशिल्प शोध ही पुरातत्वीयदृष्ट्या शतकातील महत्वपूर्ण घटना
कातळशिल्प शोध ही पुरातत्वीयदृष्ट्या शतकातील महत्वपूर्ण घटना

कातळशिल्प शोध ही पुरातत्वीयदृष्ट्या शतकातील महत्वपूर्ण घटना

sakal_logo
By

rat१६p१७.jpg-
६२७४३
रत्नागिरीः कातळशिल्प संवर्धनासाठी भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने पुढाकार घेतला. चर्चासत्रापूर्वी कोळंबे, बारसू येथील कातळशिल्पांना भेट देताना तज्ज्ञमंडळी.
------------
कातळशिल्प शोध इतिहासातील समृद्ध दालन
डॉ. वसंत शिंदे; रत्नागिरीत क्षेत्रभेटीसह चर्चासत्र, शतकातील महत्वपूर्ण घटना
रत्नागिरी, ता. १६ ः कोकणातील कातळशिल्प ही जगाच्या पाठीवर वैशिष्ट्यपूर्ण असून मानवी इतिहासातील एक समृद्ध दालन आहे. जागतिक पातळीवर पुरातत्त्वीयदृष्ट्या २१व्या शतकातील हा महत्वपूर्ण शोध आहे. आपल्या देशाला लाभलेला हा वारसा ठेवा जतन, संवर्धन होणे त्यावर सखोल संशोधन होणे ही गरज आहे. यासाठी कातळशिल्प हा राष्ट्रीय प्रकल्प म्हणून स्वीकारून स्थानिक पातळीवर काम करणारे सुधीर रिसबूड, धनंजय मराठे, डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, ऋत्विज आपटे, टीम निसर्गयात्री संस्था, राज्य पुरातत्त्व विभाग यांना विज्ञान तंत्रज्ञानाच्या अंगाने आवश्यक पाठबळ दिले जाईल, असे प्रतिपादन पुरातत्त्व शास्त्रज्ञ, डेक्कन कॉलेजचे माजी कुलगुरू प्रो. डॉ. वसंत शिदे यांनी केले.
कातळशिल्पांच्या जतन, संवर्धनासाठी भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत डीएसटी विभागाने पुढाकार घेतला आहे. या विभागाशी संबंधित विविध शास्त्रज्ञांनी कोळंबे, रुंढेतळी, बारसू, कशेळी, उक्षी, देऊड या कातळशिल्प ठिकाणांना भेट दिली. त्यानंतर पुढील दिशा ठरवण्यासाठी चर्चासत्र झाले. त्या वेळी डॉ. शिंदे बोलत होते.
कोकणातील कातळशिल्प विषयावर सखोल संशोधन व्हावे, त्याचे जतन व्हावे आणि पर्यटनाच्या माध्यमातून कातळशिल्प परिसराचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी स्थानिक पातळीवर काम करणारी निसर्गयात्री संस्था व पुरातत्त्व विभाग, महाराष्ट्र शासन यांना आधुनिक तंत्रज्ञान, विविध ज्ञान शाखांमधून संशोधनाची जोड मिळण्यासाठी हे चर्चासत्र उपयोगी ठरणार आहे.
अखिलेश झा (नवी दिल्ली) यांच्या पुढाकाराने डीएसटी समिती सदस्य प्रो. मोहन राघवन (आयआयटी, हैदराबाद), डॉ. अनिश कुमार (आयजीसीएआर, कल्पकम), डॉ. श्रीयश (जेएनयू, नवी दिल्ली), प्रमोद एस. (डीएसटी, नवी दिल्ली), डॉ. दिनकर कांजीलाल (जेयूएससी, नवी दिल्ली), डॉ. एम. जे. शंकरन (सीईओ, आयआयटी मद्रास), डॉ. अनुपम साहा (आर्ट कॉन्झर्वेशन-रिस्टोरेशन सल्लागार), डॉ. तेजस गर्गे (संचालक, पुरातत्त्व विभाग) सहभागी झाले. या वेळी सुधीर रिसबूड, धनंजय मराठे, डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, ऋत्विज आपटे (पुरातत्त्व संशोधक), तेजस्विनी आफळे (कॉन्झर्वेशन आर्किटेक्ट), राहुल नरवणे, सायली खेडेकर, सतीश (दृश्यम कम्युनिकेशन), सुहास ठाकूरदेसाई उपस्थित होते.
------------
चौकट
युनेस्कोच्या प्राथमिक यादीत
कोकणातील नऊ कातळशिल्प ठिकाणांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ प्राथमिक यादीत समावेश झाला आहे. ही देशाच्यादृष्टीने गौरवाची बाब आहे. कोकणातील हा वारसा शोध, संरक्षण आणि संवर्धन या सर्व पातळीवर रत्नागिरीमधील सुधीर रिसबूड, धनंजय मराठे आणि डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई स्वखर्चाने सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. त्यांना डॉ. तेजस गर्गे, ऋत्विज आपटे यांची तोलामोलाची साथ लाभली आहे.
--------------
कोट
कोकणातील कातळशिल्प हा अखंड भारत देशाने गौरवावा, अभिमान बाळगावा, असा समृद्ध वारसा, ठेवा आहे. या कातळशिल्प संरक्षणातून परिसराचे, येथील जैवविविधतेचेदेखील जतन होणार आहे. पर्यटनाच्या माध्यमातून परिसरात रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होणार आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने घेतलेला पुढाकार आनंदाची गोष्ट आहे.
- ऋत्विज आपटे.