‘व्यसनमुक्त बालक’ अभियान नांदगाव हायस्कूलमध्ये सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘व्यसनमुक्त बालक’ अभियान
नांदगाव हायस्कूलमध्ये सुरू
‘व्यसनमुक्त बालक’ अभियान नांदगाव हायस्कूलमध्ये सुरू

‘व्यसनमुक्त बालक’ अभियान नांदगाव हायस्कूलमध्ये सुरू

sakal_logo
By

62781
नांदगाव ः नशाबंदी अभियानात सहभागी विद्यार्थी.

‘व्यसनमुक्त बालक’ अभियान
नांदगाव हायस्कूलमध्ये सुरू
सावंतवाडी, ता. १६ ः नशाबंदी मंडळातर्फे जिल्ह्यात बालदिनाचे औचित्य साधून व्यसनमुक्त बालक जतन अभियान सप्ताहाची सुरुवात झाली. सरस्वती हायस्कूल नांदगाव येथे या सप्ताहाची सुरुवात करण्यात आली. नशाबंदी मंडळाच्या जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर यांनी बालकांच्या मूलभूत अधिकारात बालकांना आनंददायी जीवन जगण्याचा अधिकार महत्त्वाचा असतो; पण जगण्याची बदलती जीवनशैली आणि वाढती व्यसनाधीनता मुलांच्या आनंदायी जगण्यावरच गदा आणत आहे. यासाठी बालपंचायतीच्या, बाल सभेच्या माध्यमातून व्यसनांच्या विरोधात बालकांनी आवाज उठविला पाहिजे, असे मत व्यक्त करत विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधला. याशिवाय व्यसनमुक्तीच्या सापशिडी खेळाच्या माध्यमातून व्यसनांचे दुष्परिणाम याबाबत मुलांनी माहिती घेऊन व्यसनांपासून लांब राहावे, यासाठी सर्वांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली. यावेळी सरस्वती हायस्कूलचे मुख्याध्यापक सुधीर तांबे, शर्वरी सावंत, रघुनाथ कारेकर, राजेश नारकर, उपेंद्र पाटकर, कविता नलावडे, संजय सावंत, श्रीकांत सावंत, श्रावणी मोरये, आप्पा मोहिते, हरिदास खोराडे, विलास तांबे आदी उपस्थित होते.