चौपदरीकरणासंदर्भात 1 डिसेंबरला आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चौपदरीकरणासंदर्भात 1 डिसेंबरला आंदोलन
चौपदरीकरणासंदर्भात 1 डिसेंबरला आंदोलन

चौपदरीकरणासंदर्भात 1 डिसेंबरला आंदोलन

sakal_logo
By

(पान २ साठी)

चौपदरीकरणासंदर्भात १ डिसेंबरला आंदोलन

जनआक्रोश समिती ; कामाच्या दर्जाबाबत तक्रारी

रत्नागिरी, ता. १६ ः राष्ट्रीय महामार्गाचे तळेकांटे ते आरवली दरम्यान चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. या कामाचा स्थानिक लोकांना त्रास होत असून कामाच्या दर्जाबाबत अनेक तक्रारी आहेत. या विरोधात जनआक्रोश समिती संघटित झाली असून १ डिसेंबरला आंदोलन करणार असल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
रत्नागिरीत झालेल्या पत्रकार परिषदेला परशुराम पवार, युयुत्सू आर्ते, अतिश पाटणे, हरिस शेकासन, वहाब दळवी, असलम खान, शब्बीर मजगावकर, रमजान गोलंदाज, जमीर खलपे यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. रस्त्यावर मोठे खड्डे पडलेले असून वाहने चालवणे अशक्य होत आहे. महामार्गावरती प्रचंड धूळ असून शेतकऱ्यांच्या शेतीत डबर, दगड टाकून ठेवण्यात आले आहे. रस्त्यासाठी काही अनधिकृत कामे केली जात असून, त्याचा फटका महामार्गाशेजारील लोकवस्तीला होत आहे. या महामार्गाचे काम करणाऱ्‍या कंपनीकडून योग्य पद्धतीने समाधान न केल्यास १ डिसेंबरला जनआक्रोश आंदोलनाला सामोर जावे लागेल. जनआक्रोश समितीतर्फे जिल्हाधिकारी, कार्यकारी अभियंता, प्रदूषण नियंत्रण महामंडळ, खनिज कर्म अधिकारी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.