चिपळूण-औरंगाबादला सर्वसाधारण विजेतेपद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण-औरंगाबादला सर्वसाधारण विजेतेपद
चिपळूण-औरंगाबादला सर्वसाधारण विजेतेपद

चिपळूण-औरंगाबादला सर्वसाधारण विजेतेपद

sakal_logo
By

rat१६p७.jpg
६२७१७
डेरवण ः विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक वितरण करताना श्रीकांत पराडकर.

औरंगाबादला सर्वसाधारण विजेतेपद
राज्य एरोबिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धाः २९० खेळाडूंचा सहभाग
चिपळूण, ता. १६ ः राज्यस्तरीय एरोबिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत औरंगाबाद संघाने निविर्वाद वर्चस्व गाजवत सहा सुवर्णपदकांसह सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. महाराष्ट्र अमॅच्युअर जिम्नॅस्टिक्स असोसिएशन व एसव्हीजेसिटी क्रीडासंकूल यांच्यावतीने संयुक्त विद्यमाने डेरवण (चिपळूण) येथे आयोजित राज्यस्तरीय एरोबिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत औरंगाबादच्या खेळाडूंनी निविर्वाद वर्चस्व गाजवले. औरंगाबाद संघाने सहा सुवर्णपदक जिंकून सर्वसाधारण विजेतेपद पटकावले.
स्पर्धेत २२ जिल्ह्यांच्या विविध वयोगटातील २९० खेळाडूंनी आपले कौशल्य दाखवले. विजेत्या खेळाडूंना पदके व प्रमाणपत्रे देण्यात आली. राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ निवडण्यात येणार आहे. संघ लवकरच संघटनेतर्फे जाहीर केला जाईल. स्पर्धेत स्पर्धाप्रमुख म्हणून डॉ. आदित्य जोशी यांनी काम पाहिले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण श्री विठ्ठल जोशी चॅरिटिज ट्रस्टचे श्रीकांत पराडकर, डॉ. सुवर्णा पाटील, डॉ. नेताजी पाटील, प्रफुल्ल गोडबोले यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी राज्य संघटनेचे सचिव डॉ. मकरंद जोशी, उपाध्यक्ष बाळू ढवळे, सहसचिव मंदार म्हात्रे, आशिष सावंत सदस्य गणेश ठाकरे हे उपस्थित होते.

स्पर्धेचा निकाल
पुरुष एकेरी ः धैर्यशील देशमुख, औरंगाबाद (१९.१५), सुधंव बोर्डे, ठाणे (१६.२०), संकेत चिंतलवाड, जालना ( १६.१५).
मिश्र दुहेरी ः साक्षी लड्डा, धैर्यशील देशमुख, औरंगाबाद (१६.०५०), नॅन्सी बरोली, सुधंव बोर्डे, ठाणे (१४.४५०), संकेत चिंतलवाड, अदिती तळेगावकर, जालना (११.८५०). महिला एकेरी ः साक्षी डोंगरे, औरंगाबाद (१६.००), नॅन्सी बरोली, ठाणे (१३.४५०), सुषमा, लातूर १२.३००). तिहेरी ः आर्य शहा, स्मिथ शहा, संदेश चिंतलवाड, औरंगाबाद (१६.४५०), रमण सिंगीतम, शेख जुनेद शेरू, शुभम गहूंगे, परभणी (११.७०), हर्शल जगभिये, अस्था जोंधळेकर, सुखदा हंबर्डे, अमरावती (१०.७५०). ग्रुप ः विजय इंगळे, अभय उंटवाल, उदय मधेकर, प्रेम बनकर, गौरव जोगदंड, औरंगाबाद (१५.९५०), रमण सिंगीतम, शेख शेरू, शुभम गहुंगे, आदित्य पांचाल, प्रशिक कापसे, परभणी (११.००), रोहित कांबळे, भरत जाधव, लुक्स रूपकर, शेख तोफिक मोहम्मद, रिषभ कटूल, जालना (१०.५००). एरो डान्स ः औरंगाबाद (१४.६५०), लातूर (११.५०).