पन्हाळेकाजी लेण्यांकडे जाणारा मार्ग खाचखळग्यातून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पन्हाळेकाजी लेण्यांकडे जाणारा मार्ग खाचखळग्यातून
पन्हाळेकाजी लेण्यांकडे जाणारा मार्ग खाचखळग्यातून

पन्हाळेकाजी लेण्यांकडे जाणारा मार्ग खाचखळग्यातून

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat१६p२५.jpg-
६२७९३

पन्हाळेकाजी येथील दगडात कोरलेली लेणी.


पन्हाळेकाजी लेण्यांकडे जाणारा मार्ग खाचखळग्यांचा

पर्यटकांमध्ये घट ; रस्ता कामासाठी २ कोटी ६१ लाख मंजूर

सकाळ वृत्तसेवा
दाभोळ, ता. १७ ः दापोली तालुक्यातील महत्वाचे पर्यटनस्थळ असलेल्या पन्हाळेकाजी येथे खाचखळग्यातील रस्ता पार करत पर्यटकांना पन्हाळेकाजी लेणी पाहण्यासाठी जावे लागत होते. त्यामुळे येथे येणाऱ्‍या पर्यटकांमध्ये घट झाली असून त्याचा परिणाम पर्यटन व्यवसायावर होत आहे. दापोलीचे आमदार योगेश कदम यांच्या प्रयत्नाने तेरेवायंगणी पन्हाळेकाजी रस्त्यासाठी २ कोटी ६१ लाख २५ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्यामुळे पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
दापोली तालुक्यातील पन्हाळेकाजी येथील कोटजाई नदीच्या काठाने असलेल्या डोंगरात २९ गुहांमध्ये लेण्या आहेत. या लेण्या पाहण्यासाठी पर्यटक, अभ्यासक, विद्यार्थीसहली या कायमच येत असतात. दापोली-दाभोळ मार्गावर लाटीमाळ येथून तेरेवायंगणी या गावाकडून पन्हाळेकाजी येथे जाण्यासाठी जवळचा मार्ग आहे. या मार्गावर तेरेवायंगणी, गावराई, पन्हाळेकाजी ही महत्वाची गावे असून या मार्गावर पन्हाळेकाजीकडील गावे तसेच नानटे माथेगुजरकडील गावांना जोडणारा हा रस्ता दळणवळणाच्यादृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. या रस्त्याची अनेक वर्ष सुधारणा झाली नसल्याने अवस्था बिकट झाली होती. त्यामुळे अनेकदा या मार्गावरील एसटी वाहतूक सेवादेखील बंद ठेवावी लागत होती. पर्यटकांची वाहनेही या रस्त्यामुळे नादुरुस्त होत आहेत. त्यामुळे अनेक पर्यटक रस्त्याची ही अवस्था पाहून माघारी फिरतात. ही माहिती मिळताच आमदार कदम यांनी या रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर होण्यासाठी प्रयत्न केले आहेत.