विमा प्रतिनिधींच्या मागण्यांबाबत अधिवेशनात प्रश्न मांडू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विमा प्रतिनिधींच्या मागण्यांबाबत अधिवेशनात प्रश्न मांडू
विमा प्रतिनिधींच्या मागण्यांबाबत अधिवेशनात प्रश्न मांडू

विमा प्रतिनिधींच्या मागण्यांबाबत अधिवेशनात प्रश्न मांडू

sakal_logo
By

(पान 2 साठी)

फोटो ओळी
-rat16p20.jpg-
62746
रत्नागिरी ः लाइफ इन्शुरन्स एजंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्यावतीने खासदार विनायक राऊत यांना निवेदन देताना रत्नागिरी शाखेचे विमा संघटनेचे अध्यक्ष अरुण पाटील, आमदार राजन साळवी यांच्यासह विमा प्रतिनिधी.

विमा प्रतिनिधींच्या मागण्यांबाबत अधिवेशनात प्रश्न मांडू

सकाळ वृत्तसेवा ः
रत्नागिरी, ता. 16 ः संसदेच्या हिवाळी अधिवेशनात एलआयसी विमा प्रतिनिधींच्या विविध मागण्यांबाबतचा महत्वाचा विषय मांडू, अशी ग्वाही रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी दिली. लाइफ इन्शुरन्स एजंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरीतील विमा प्रतिनिधींनी खासदार राऊत यांनी भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले. त्या वेळी खासदार राऊत बोलत होते.
या वेळी आमदार राजन साळवी यांच्यासमवेत एलआयसी संघटनेच्या शाखेचे अध्यक्ष अरुण पाटील, कार्याध्यक्षा स्मिता ढवळे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर राऊत, सेक्रेटरी मोहन हजारे, सहसचिव अजित बोंबले, खजिनदार सुनील सावंत, सहखजिनदार प्रकाश पाटील यांच्यासमवेत स्थानिक विमा प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी अरुण पाटील यांनी पॉलिसीधारकांचा बोनस वाढला पाहिजे, विमा प्रतिनिधींसाठी वेल्फेअर फंड तयार करावा, कर्जाचे व विलंब शुल्काचे व्याजदर कमी व्हावेत, विमा हप्त्यावरील जीएसटी रद्द करावा अशा विविध मागण्यांचे निवेदन खासदार राऊत यांच्याकडे सुपुर्द केले.
गेल्या सप्टेंबरपासूनच एलआयसी विमा प्रतिनिधींनी असहकार आंदोलन पुकारले. नंतर ठिय्या आंदोलनही केले. लढाई विमा पॉलिसीधारक आणि विमा प्रतिनिधी यांच्या न्याय्य हक्कांसाठी संघटना लढा देत आहे. सर्व संघटनांनी संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून न्याय मागत असल्याचे अरुण पाटील यांनी खासदार राऊत यांना सांगितले.