परंपरा, इतिहास भावी पिढीला समजावणे गरजेचे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

परंपरा, इतिहास भावी पिढीला समजावणे गरजेचे
परंपरा, इतिहास भावी पिढीला समजावणे गरजेचे

परंपरा, इतिहास भावी पिढीला समजावणे गरजेचे

sakal_logo
By

(पान ५ साठी)

फोटो ओळी

- ratchl१६२.jpg ः
६२८०५
चिपळूण ः जिल्हास्तरीय स्नेहमेळाव्यात मनोगत व्यक्त करताना अध्यक्ष समीर गुप्ते.

परंपरा, इतिहास भावी पिढीला समजावणे गरजेचे

समीर गुप्ते ; चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजाचा स्नेहमेळावा

चिपळूण, ता. १६ ः आपल्या समाजाची परंपरा आणि इतिहास, समाजातील भावी पिढीला समजावून देणे सर्वांची जबाबदारी आहे. तरुणांनी समाजाला प्रेरणादायी वळण मिळेल यासाठी आग्रही भूमिका घ्यावी, असे प्रतिपादन अखिल भारतीय चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजाच्या मध्यवर्ती संस्थेचे अध्यक्ष समीर गुप्ते यांनी व्यक्त केले. ज्ञातिबांधवांच्या जिल्हास्तरीय स्नेहमेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
शहरातील ताम्हाणे बँक्व्हेट हॉलमध्ये जिल्ह्यातील पहिल्याच या मेळाव्यास सीकेपी अर्थात् चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजबांधव, भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष समीर गुप्ते, सामाजिक कार्यकर्ते सुनील देशपांडे, सीकेपी एज्युकेशन सोसायटीचे सचिव अजित कोंढवीकर, संजीव सुळे, खेडचे सुनील चिटणीस, बांधकाम व्यावसायिक समीर ताम्हाणे, चिपळूण कार्यकारिणीचे संजय वैद्य, सुदीप गुप्ते आदी मान्यवर तसेच जिल्ह्यातील समाजबांधव उपस्थित होते. याप्रसंगी मृत्यूपश्चात देहदान केलेल्या प्रकाश कारखानीस व ज्योती कारखानीस यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्ष समीर गुप्ते यांनी विधायक संदर्भ देत समाजातील तरुणांना योग्य मार्गदर्शन करण्यास अनेक मान्यवर उत्सुक असून आपण स्वतः प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही दिली. रोहित कुळकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी अनुबंध सोहळा प्रत्येकाला विशेष ''स्मृति-चिन्ह'' देऊन पार पडला. ज्ञातीबांधवांच्या कलागुणांच्या सांस्कृतिक कार्यक्रमानंतर स्नेहसंमेलनाची सांगता झाली.