रत्नागिरीत ३१ हजारांची फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरीत ३१ हजारांची फसवणूक
रत्नागिरीत ३१ हजारांची फसवणूक

रत्नागिरीत ३१ हजारांची फसवणूक

sakal_logo
By

रत्नागिरीत ३१ हजारांची फसवणूक
रत्नागिरी ः महावितरण अॅप व एनीडेस्क एक लाल रंगाचे अॅप अपडेट करून घेऊन बॅंकेतून ३० हजार ८६९ रुपयांची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्याविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मंगळवारी (ता. १५) साडेअकरा ते साडेबाराच्या सुमारास सह्याद्रीनगर, नाचणे, रत्नागिरी) येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्वप्नील सुभाष कांबळे (वय २४, रा. संकल्पग्रह निर्माण संस्था सह्याद्रीनगर, नाचणे-रत्नागिरी. मुळ ः धामणी, ता. संगमेश्वर) हे नाचणे येथे घरी असताना त्यांना अज्ञाताचा फोन आला व त्याने महावितरण अॅप व एनीडेस्क एक लाल रंगाचा अॅप स्वप्नील कांबळे यांच्याकडून अपडेट करून घेतला. त्यानंतर त्यांच्या सारस्वत बॅंक शाखा रत्नागिरीमधील अकाउंटवरून आलेला ओटीपी त्यांच्याकडून घेतला आणि संशयिताने स्वप्नील कांबळे यांच्या बॅंक खात्यातील ३० हजार ८६९ रुपये ९६ पैशांची ऑनलाइन काढून त्यांची फसवणूक केली. या प्रकरणी स्वप्नील कांबळे यांनी शहर पोलिसात तक्रार दिली.
-----------
दुचाकीवरून पडून स्वार जखमी
रत्नागिरीः मुंबई-गोवा महामार्गावर निवळी ते हातखंबा रस्त्यावर दुचाकी निष्काळजीपणे चालवल्यामुळे अपघात झाला. स्वतःच्या दुखापतीस कारणाभूत झालेल्या स्वाराविरुद्ध ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. मिलिंद दत्ताराम चव्हाण (वय ५३, रा. सदानंदवाडी-मांडवी, रत्नागिरी) असे संशयित स्वाराचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. १४) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास निवळी ते हातखंबा येथील शांतीधाबा ते ईश्वरधाबा समोरील रस्त्यावर घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित स्वार चव्हाण हे दुचाकी (क्र. एमएच-०८ एएफ ३९७४) घेऊन निवळी ते हातखंबा असे जात असताना दुचाकी निष्काळाजीपणे चालवल्यामुळे दुचाकी महामार्गावरील कच्च्या रस्त्यावर आणल्याने ती स्लीप झाली. या अपघातात स्वाराच्या डोक्याला, चेहऱ्याला व डाव्या हाताला दुखापत झाली.
--------
लोखंडी फाईटरने एकास मारहाण
रत्नागिरी ः शहरानजीकच्या कारवांचीवाडी-आदर्श वसाहत येथे खोटे बोलत असल्याचा राग धरून, शिवीगाळ व लोखंडी फाईटरने मारहाण केली. या प्रकरणी संशयिताविरुद्ध ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. भिमा एकनाथ खेत्री (रा. खडपेवठार, झोपडपट्टी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. १४) सायंकाळी साडेसातच्या सुमारास आदर्श वसाहत-कारवांचीवाडी येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रमेश चंद्रकांत खेत्री (वय ३९, रा. सिताई पार्क-रत्नागिरी) हे व संशयित एकमेकांचे ओळखीचे आहेत. रमेश खेत्री यांची पत्नी राजेश्री हे तिचे काका यल्लाप्पा शिंदे यांच्या घरी बारशाला गेलेली होती. तिला आणण्यासाठी रमेश खेत्री गेले असता संशयित भिमा खेत्री याने त्यांना विचारले की, माझा मेव्हणा बसुराज शिंदे हा सकाळपासून तुझ्यासोबत आहे का? त्यावर रमेशने नाही असे उत्तर दिले. आपल्याशी खोटे बोलत असल्याचा राग मनात धरून संशयित भिमा खेत्री यांनी रमेशला शिवीगाळ करून लोखंडी फाईटने डोळ्याच्या भुवईवर मारून दुखापत केली. या प्रकरणी रमेश खेत्री यांना ग्रामीण पोलिसात तक्रार दिली.