हंगामी स्थलांतरित मुलं शाळेच्या प्रवाहात आणणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हंगामी स्थलांतरित मुलं शाळेच्या प्रवाहात आणणार
हंगामी स्थलांतरित मुलं शाळेच्या प्रवाहात आणणार

हंगामी स्थलांतरित मुलं शाळेच्या प्रवाहात आणणार

sakal_logo
By

(पान ३ साठी)

हंगामी स्थलांतरित मुलं शाळेच्या प्रवाहात आणणार

जिल्ह्यात सर्व्हेक्षण ; २० नोव्हेंबर ते ५ डिसेंबर अखेर उपक्रम

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १६ ः विविध कामासाठी परराज्यातून किंवा परजिल्ह्यातून हंगामी स्थलांतरित असलेल्या कुटुबातील ६ ते १८ वयोगटातील मुलांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी जिल्ह्यात २० नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत सर्व्हेक्षण केले जाणार आहे.
सप्टेंबर ते मे महिन्याच्या कालावधीत बांधकाम, खाणकाम, रस्ते, कोळसाखाणी, वीटभट्टी, आंबा व्यवसाय, मच्छीमारी व्यावसायासाठी हंगामी कामासाठी कुटुंबाचे स्थलांतर करून रत्नागिरी जिल्ह्यात येतात. गेल्या काही वर्षांमध्ये परराज्यातून हंगामी नोकरीसाठी येणारी ही लोकं कुटुंबही बरोबर घेऊन येतात. पालकांसोबत बालकही असतात. त्या मुलांचे शिक्षण तसेच राहते. त्या मुलांचे स्थलांतर थांबवणे किंवा स्थलांतरित बालकांना त्याच परिसरात शिक्षणाच्या प्रवाहात कायम ठेवणे या उद्देशाने शिक्षण विभागाकडून पावले उचलण्यात आली आहेत. स्थलांतरित बालकांना शिक्षण हमीकार्ड दिले जाणार आहे. जेणेकरून काम पूर्ण झाल्यानंतर पालकांनी पुन्हा दुसरीकडे स्थलांतर केल्यास तेथील शाळेत तत्काळ प्रवेश मिळू शकेल. कामाच्या ठिकाणी सर्वेक्षण करून सर्व मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षकांना सूचना करण्यात आल्या आहेत. हे सर्वेक्षण व्यापक स्तरावर राबवून एकही मूल शाळाबाह्य राहणार नाही, याची काळजी शिक्षण विभागाकडून घेण्यात आली आहे. ६ ते १८ वयोगटातील शाळाबाह्य मुले आढळून आल्यास संबंधित तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकुमार पुजार व शिक्षणाधिकारी वामन जगदाळे यांनी केले आहे.


असे आहे वेळापत्रक

जिल्ह्यात ३ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांचे सर्वेक्षण २० नोव्हेंबर ते ५ डिसेंबर २०२२ या कालावधीत होणार आहे. यामधील ३ ते ६ वयोगटाची जबाबदारी जिल्हास्तरावर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे आहे. ६ ते १४ वयोगटाची शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद आणि १४ ते १८ वयोगटाची शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्याकडे दिली गेली आहे.

-------------बातमीदार---कळंबटे.....