‘कणकवली खरेदी-विक्री’ निवडणुकीसाठी ११ अर्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘कणकवली खरेदी-विक्री’ 
निवडणुकीसाठी ११ अर्ज
‘कणकवली खरेदी-विक्री’ निवडणुकीसाठी ११ अर्ज

‘कणकवली खरेदी-विक्री’ निवडणुकीसाठी ११ अर्ज

sakal_logo
By

‘कणकवली खरेदी-विक्री’
निवडणुकीसाठी ११ अर्ज

कणकवली,ता. १६ ः तालुका खरेदी विक्री संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज ११ नामनिर्देशनपत्र दाखल झाली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या (ता.१७) शेवटचा दिवस आहे. आज शिवसेना शिंदेगट, भाजप आणि शिवसेना उध्दव ठाकरे गटाकडून उमेदवारी दाखल करण्यात आली. त्यामुळे येथे तिरंगी लढतीची शक्यता आहे. मात्र, अर्ज मागे घेतल्यानंतर लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
आज व्यक्ती गटात - प्रवीण पारकर, प्रकाश घाडीगांवकर, रामदास रासम, शेती संस्था गटातून - किरण गावकर, राजेंद्र सावंत, प्रशांत सावंत, सोनू चिंदरकर, आनंद ठाकूर, दिपक कांडर, संजय रावले आणि अनुसूचीत जाती गटातून- सुभाष जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तालुका खरेदी विक्री संघाची निवडणूक १४ डिसेंबरला होणार आहे. एकूण १५ जागांसाठी ही निवडणूक होत असून या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज ११ नोव्हेंबर पासून दाखल करावयाचे आहेत. उद्या गुरुवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे.