गोधनाच्या प्रसारासाठी पावशीत प्रकल्प | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोधनाच्या प्रसारासाठी पावशीत प्रकल्प
गोधनाच्या प्रसारासाठी पावशीत प्रकल्प

गोधनाच्या प्रसारासाठी पावशीत प्रकल्प

sakal_logo
By

62856
पावशी ः मिटक्याचीवाडी येथे साकारलेला गोशाळा प्रकल्प. (छायाचित्र ः अजय सावंत)

गोधनाच्या प्रसारासाठी पावशीत प्रकल्प

रवींद्र सुर्वे ः सव्वा कोटींची उलाढाल अपेक्षित, भारतीय वंशाच्या ८० गायी

कुडाळ, ता. १६ ः पावशी-मिटक्याचीवाडी (ता.कुडाळ) येथे १८ एकर क्षेत्रात संपूर्ण ऑरगॅनिक गजानन महाराज कृषी उद्यान प्रकल्प साकारला आहे. या प्रकल्पात भारतीय वंशाच्या गिरगायी, वासरू मिळून ८० गायी आहेत. भारतीय वंशाच्या गायींचा प्रसार, गिरगायींचे महत्त्व शेतकऱ्यांना समजावे, या उद्देशाने हा प्रकल्प साकारला गेल्याची माहिती पत्रकार परिषदेत प्रकल्पाचे संचालक रवींद्र सुर्वे यांनी दिली.
या प्रकल्पात गोशालेसह विविध लागवड केली आहे. शेणापासून विद्युत निर्मितीच्या प्रयत्नांसह गायीच्या दुधाऐवजी मलमूत्राचा विचार केला जाणार आहे. डिसेंबर २०२३ अखेर या प्रकल्पातून सव्वा कोटींची उलाढाल होईल, असेही त्यांनी सांगितले.
निसर्गाच्या सान्निध्यात वसलेला सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करत आहे. या मातीतच सोने आहे, हे येथील तरुण पिढीला समजून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावी, हा दूरदृष्टीकोन घेऊन अनेक माणसे या क्षेत्राकडे वाटचाल करीत आहेत. बँकिंग क्षेत्रात स्वेच्छा निवृत्ती घेऊन कृषी क्षेत्रात सामाजिक दृष्टीकोन ठेवून अशा प्रकल्पातून इतरांचा सर्वांगीण विकास कसा होईल, या उद्देशाने आवळेगाव येथील रवींद्र सुर्वे यांनी मुंबई-गोवा महामार्गावर पावशी-मिटक्याचीवाडी या ठिकाणी गजानन महाराज कृषी उद्यान साकारले आहे. सुमारे १८ एकर क्षेत्रात संपूर्ण ऑरगॅनिकवर हा प्रकल्प साकारला आहे. कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल करतानाच देशावरच्या गिरगायीचा या ठिकाणी प्रचार व प्रसार करण्यासाठी त्यांनी प्रकल्पाच्या दिशेने वाटचाल केली आहे. आज याबाबत त्यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, ‘‘कोकण एवढे सुंदर वैभव जगात नाही. कोकणच्या पारंपरिकतेला जोड देऊन कृषीतून आर्थिक सुबत्ता कशी साधता येईल, या दृष्टीने आमची वाटचाल सुरू आहे. येथील तरुण वर्ग शिक्षण झाले की मुंबईकडे नोकरीसाठी वाटचाल करतो. त्यामुळे त्याला या मातीतच सोने आहे, कृषीतूनच आर्थिक प्रगती होणार, हे त्याला पटले पाहिजे. यासाठी त्याची पावले या ठिकाणीच थांबावीत, यासाठी आमचा प्रयत्न आहे. आज जगात ऑरगॅनिकला मोठी मागणी आहे. सुरुवातीला मी जुनागढ येथील भारतीय वंशाच्या दहा गायी आणल्या. आता या ठिकाणी गोशाळेत ८० गिरगायी आहेत. सहा वर्षांपूर्वी दहा गिरगायी त्यावेळी प्रत्येकी ७५ हजार रुपयांना घेतली. दहा वर्षांपूर्वी या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली. आपल्याकडे अन्य विदेशी गाईंचे बीज आणले गेले आहे. जगात येथील दूध सर्वश्रेष्ठ समजले जाते. ब्राझीलसारखा देश आपल्या भारतीय वंशाच्या गायी आपल्याकडे घेऊन जातो. ही जनावरे त्या देशात किमान २५ ते ५० लिटर दूध देतात. या उपक्रमातून केवळ पैसा कमावण्याचे उद्दिष्ट नसून गोवशांचा प्रसार व्हावा, येथील शेतकऱ्यांकडे या गायी याव्यात, हा उद्देश आहे. दरम्यान, यावेळी राजू राऊळ, प्रभाकर चव्हाण आदी उपस्थित होते.
--
कोट
62855
पुढील महिन्यात या उद्यानातून सीनियर गाय व त्याचे वासरू शेतकऱ्यांना ५० हजारात दिले जाणार आहे. दरम्यानच्या काळात गायीचे निधन झाल्यावर तिच्यावर अंत्यसंस्कार याच ठिकाणी करून ज्यांनी खरेदी केली, त्यांना आमची जबाबदारी म्हणून २५ हजार देण्याचा अभिनव उपक्रमही राबविला जाणार आहे. या गोशाळेत वर्जिन कोकोनट ऑइल, ऑरगॅनिक काजू, भाजीपाला आदी उपक्रमही राबवू.
..............
चौकट
नोकरी सोडून शेतीत
रवींद्र सुर्वे हे मुंबईमध्ये बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये सेवेत होते. तेथे त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन कृषीकडे पावले टाकली. यापूर्वी त्यांनी जागतिक पातळीवर अनेकदा कबड्डी स्पर्धेचे नेतृत्व केले आहे. एक नामांकित कबड्डीपटू म्हणून त्यांची ख्याती आहे.