दुकान कारवाईत पालिकेचा भेदभाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुकान कारवाईत पालिकेचा भेदभाव
दुकान कारवाईत पालिकेचा भेदभाव

दुकान कारवाईत पालिकेचा भेदभाव

sakal_logo
By

62878
सावंतवाडी : इंदिरा गांधी कॉम्प्लेक्समध्ये नियमाबाहेर दुकाने लावणाऱ्यांवर कारवाई करताना पालिका अधिकारी.

दुकान कारवाईत पालिकेचा भेदभाव

मनसेचा आरोप; सावंतवाडी कॉम्प्लेक्सचे प्रकरण

सावंतवाडी, ता. १६ ः येथील इंदिरा गांधी कॉम्प्लेक्समध्ये नियमबाह्य दुकाने लावणाऱ्या दुकानदारांवर आज पालिका प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली; मात्र या कारवाईमध्ये ठराविक दुकानदारांवरच कारवाई करत काही दुकानदारांना यातून वगळण्यात आले. त्यामुळे या कारवाईविरोधात मनसेने आक्रमक भूमिका घेत शहर सचिव कौस्तुभ नाईक यांनी आवाज उठवला. कारवाई करायची असेल तर सरसकट कारवाई करा, अशी मागणी केली. मनसेच्या या भूमिकेनंतर प्रशासनाकडून सरसकट कारवाई हाती घेण्यात आली.
पालिका प्रशासनाकडून आज अचानक इंदिरा गांधी कॉम्प्लेक्समध्ये गाळेधारकांनी नियमाच्या बाहेर लावलेल्या दुकानांवर कारवाई करत साहित्य जप्त केले. अचानक केलेल्या कारवाईनंतर दुकानधारक गडबडले; परंतु ही कारवाई करताना अधिकाऱ्यांकडून काहींना वगळण्यात आले. ही माहिती मनसेचे शहर सचिव नाईक यांना कळतात त्यांनी या कारवाईला विरोध केला. मोजकी दुकाने सोडून इतरांवर कारवाई का, असा सवाल करत कारवाई करायची असेल तर सरसकट करा, अशी मागणी केली. नाईक यांनी घेतलेल्या या आक्रमक भूमिकेनंतर प्रशासनाने आपली भूमिका बदलत सरसकट कारवाई हाती घेत संबंधित दुकानदारांना आवश्यक त्या सूचना दिल्या.