रत्नागिरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी
रत्नागिरी

रत्नागिरी

sakal_logo
By

समुद्रात बुडणाऱ्या शाळकरी मुलाला जीवदान...

रत्नागिरीतील घटना ; स्थानिक ग्रामस्थांची तत्परता

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी, ता. १६ : कोल्हापुरातील करवीर तालुक्यातील उचगाव येथून सहलीसाठी रत्नागिरीत आलेल्या १०० मुलांच्या ग्रुपमधील तेरा वर्षीय मुलगा आरे-वारे समुद्रात बुडाला. स्थानिकांच्या मदतीने त्याला वेळीच बाहेर काढण्यात आले. प्रकृती खालावल्याने त्याला रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात उपचार करून कोल्हापूरला हलविले आहे. बुधवारी दुपारी दीड वाजता ही घटना घडली.


याबाबत मिळालेली माहिती अशी. कोल्हापूर उजगाव येथील एका शाळेची सहल रत्नागिरीत आली होती. शिक्षक १०० मुलांना घेऊन रत्नागिरीत आले होते. सर्वजण दुपारी एकच्या सुमारास आरे वारे समुद्रकिनारी पोचले. तेथे गेल्यानंतर मुले मौज मजा करण्यासाठी समुद्रात उतरली होती. बराच वेळ मजा मस्ती सुरू असताना अचानक आदित्य अरुण मंचावकर (वय 13) हा मुलगा पाण्याच्या प्रवाहाबरोबर समुद्रात ओढला जाऊ लागला. हे लक्षात येताच सोबत असलेल्या मुलासह शिक्षकांनी ओरडा केला. तो ऐकून स्थानिक ग्रामस्थ मदतीसाठी धावले. त्यातील काही ग्रामस्थांनी समुद्र जाऊन आदित्यला बाहेर काढले. त्यानंतर आदित्यला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तो मूळचा कोल्हापूर येथे असल्याने रात्री उशिरा त्याला कोल्हापूर येथे हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस स्थानकाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली.
------------