हळवल फाट्यावर अपघात कमी होण्यासाठी उपाययोजना करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हळवल फाट्यावर अपघात कमी होण्यासाठी उपाययोजना करा
हळवल फाट्यावर अपघात कमी होण्यासाठी उपाययोजना करा

हळवल फाट्यावर अपघात कमी होण्यासाठी उपाययोजना करा

sakal_logo
By

kan171.jpg
62898
कणकवली : युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांना निवेदन दिले.
-------------------
हळवल फाट्यावर अपघात कमी
होण्यासाठी उपाययोजना करा
युवा सेनेची मागणी : कणकवली प्रांताधिकाऱ्यांना दिले निवेदन
कणकवली, ता. १७ : मुंबई गोवा महामार्गावरील हळवल फाट्यावर सातत्‍याने अपघात होत आहेत. तसेच या अपघातांमध्ये जीवित हानी होत आहे. पादचारी आणि त्‍या भागातील नागरिकांचेही जीव धोक्‍यात येण्याची शक्‍यता आहे. त्‍यामुळे हळवल फाट्यावर अपघातांची मालिका कमी करण्यासाठी उपाय योजना करा अशी मागणी युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली.
युवा सेना विभागप्रमुख रोहित राणे यांच्यासह युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांना निवेदन दिले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले, माजी उपजिल्हाप्रमुख जयसिंग नाईक, माजी युवासेना जिल्हाप्रमुख अॅड. हर्षद गावडे, उपतालुका प्रमुख राजु राणे, महिला तालुकाप्रमुख वैदेही गुडेकर, कळसुली विभागप्रमुख चंदु परब, युवासेना विभागप्रमुख रोहीत राणे, अरुण राणे, विलास गुडेकर, गणेश राणे, सौरभ सावंत, मधु चव्हान, सचिन राणे, रवी परब, सुभाष परब, विजय परब, जनार्दन डोबकर आदी उपस्थित होते.
निवेदनात म्‍हटले की, महामार्गावरील हळवल फाटा येथील अपघात कमी करण्यासाठी त्‍या परिसरात रम्बलर्स बसविण्यात यावेत. हळवल तिठा येथे हायमास्ट बसवला जावा, उड्डाणपुल संपल्‍यानंतर लगेच धोकादायक वळण असल्‍याबाबतचा फलक लावावा तसेच अवजड वाहने पलटी होऊ नयेत यासाठी रस्त्याची रचना बदलण्यात यावी. राष्‍ट्रीय महामार्ग विभाग आणि महामार्ग ठेकेदार यांच्याकडून वरील उपाययोजना आठ दिवसांत करून घ्याव्यात अन्यथा आम्‍हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असेही निवेदनात नमूद केले आहे.