वदिनी इन्फोसेंटर कंपनीमध्ये निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वदिनी इन्फोसेंटर कंपनीमध्ये निवड
वदिनी इन्फोसेंटर कंपनीमध्ये निवड

वदिनी इन्फोसेंटर कंपनीमध्ये निवड

sakal_logo
By

(टुडे पान २ साठी)
(टीप- जाहिरातदार आहे.)

फिनोलेक्स अॅकॅडमीच्या १४ विद्यार्थ्यांची
वदिनी इन्फोसेंटर कंपनीमध्ये निवड
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १७ ः फिनोलेक्स अॅकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजीच्या २०२२-२३ या चालू शैक्षणिक वर्षात शिकत असलेल्या १४ विद्यार्थ्यांची वदिनी इन्फोसेंटर या नामांकित कंपनीमध्ये नोकरीसाठी निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना चार लाखांचे वार्षिक पॅकेज देण्यात आले आहे. फिनोलेक्स अॅकॅडमीच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागामार्फत इन्फोसेंटर कंपनीचा कॅम्पस रिक्रुटमेंट ड्राईव्ह आयोजित केला होता. या निवडप्रक्रियेमध्ये टेक्निकल इंटरव्ह्यू, मॅनेजेरिअल राउंड आणि एचआर इंटरव्ह्यू या चाचण्यांचा समावेश होता. या सर्व फेऱ्यांमधून फिनोलेक्स अॅकॅडमीच्या राहुल प्रसाद, प्रज्ञा नाबर, लक्षिता प्रभू, सायली नलावडे, जान्हवी जायगडे (सर्व आय.टी), साहिल घाटे, कौस्तुभ देसाई, श्रुती भुसे, श्वेता सुतार, ओंकार कारेकर, प्रतीक्षा पाटील (सर्व एमसीए), प्रज्ञेश ढापरे, परेश जोशी, रिद्धी वासूरकर (इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन) या विद्यार्थ्यांची निवड कंपनीने केली. निवड प्रक्रियेसाठी कंपनीतर्फे व्यवस्थापकीय संचालक हेमंत करमरकर, डायरेक्टर समीर जोशी व तज्ज्ञ टीम फिनोलेक्स अॅकॅडमीमध्ये आली होती.
कंपनी गेली पाच वर्ष फिनोलेक्स अॅकॅडमीमध्ये येऊन विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड करत आहे. वदिनी इन्फोसेंटर ही एक बहुराष्ट्रीय आयटी कंपनी असून ही कंपनी त्यांच्या ग्राहकांना क्लाऊड बेस्ड सर्व्हिस नाऊ संबंधित प्रॉडक्ट/ सर्व्हिसेस प्रदान करते. कंपनीचे मुख्यालय अमेरिकेमध्ये असून कंपनीच्या विविध शाखा युएसए आणि युकेमध्ये आहेत. कंपनीचे ग्लोबल सेंटर ऑफ एक्सलन्स पुण्यात आहे. विद्यार्थ्यांच्या निवडीबद्दल फिनोलेक्स अॅकॅडमीच्या अध्यक्षा श्रीमती अरुणा कटारा, मॅनेजिंग ट्रस्टी अमृता कटारा, प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद आणि अॅकॅडमीच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.