आंतरराष्ट्रीय विज्ञान दिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंतरराष्ट्रीय विज्ञान दिन
आंतरराष्ट्रीय विज्ञान दिन

आंतरराष्ट्रीय विज्ञान दिन

sakal_logo
By

(टुडे पान २ साठी)

फोटो ओळी
-rat१७p२.jpg-
६२९२१
रत्नागिरी ः आंतरराष्ट्रीय विज्ञानदिनानिमित्त अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांसमवेत मागे उभे परीक्षक, प्राध्यापक.

अभ्यंकर कनिष्ठ महाविद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय विज्ञान दिन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १७ ः विज्ञान आणि विकासाबद्दलचा जनमानसातील दृष्टिकोन अधिक प्रगल्भ करण्याच्या उद्देशाने जगभरात शांतता आणि विकासासाठी आंतरराष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्त अभ्यंकर- कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान विभागातर्फे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानविषयक कुतूहल निर्माण होऊन वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी स्पर्धा आयोजित केली.
स्पर्धेचे बक्षीस वितरण राधाबाई शेट्ये सभागृहात झाले. स्पर्धा पूर्वनिवड फेरी, प्रात्यक्षिक फेरी आणि प्रश्नमंजूषा फेरी अशा एकूण तीन फेऱ्यांमध्ये घेण्यात आली. ६ संघातून अंतिम फेरीत विजेत्या तीन संघांची निवड करण्यात आली. अंतिम फेरीसाठी प्रा. डी. आर. वालावलकर आणि प्रा. महेश नाईक यांनी काम पाहिले. स्पर्धेसाठी गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील प्रा. बाबासाहेब सुतार, डॉ. उमा जोशी, डॉ. सोनाली कदम आणि डॉ. उमेश संकपाळ यांनी मूल्यमापनाची जबाबदारी सांभाळत विद्यार्थ्यांना प्रोत्साहनही दिले. स्पर्धेच्या यशस्वी संयोजनासाठी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे सहकार्यवाह प्रा. श्रीकांत दुदगीकर, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. चिंतामणी दामले, पर्यवेक्षिका अस्मिता कुलकर्णी, विज्ञान विभागप्रमुख सुनील गोसावी यांचे मार्गदर्शन लाभले. सूत्रसंचालन प्रा. गौरी शितूत यांनी केले.