शनिवार, रविवारी विशेष मतदार नोंदणी मोहिम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शनिवार, रविवारी विशेष मतदार नोंदणी मोहिम
शनिवार, रविवारी विशेष मतदार नोंदणी मोहिम

शनिवार, रविवारी विशेष मतदार नोंदणी मोहिम

sakal_logo
By

(टुडे पान २ किंवा ३ साठी आवश्यक)

शनिवार, रविवारी विशेष मतदार नोंदणी मोहीम
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १७ ः भारत निवडणूक आयोगाने २ जानेवारी २०२३ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. या अंतर्गत विशेष मतदार नोंदणी मोहिम शनिवार (ता. १९) आणि रविवारी (ता. २०) राबवण्यात येणार आहे.
विशेष मोहिमेदरम्यान प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी उपस्थित राहून मतदारांचे अर्ज स्वीकारणार आहेत. या मोहिमेचा मतदारांनी लाभ घ्यावा. ज्यांची नावे मतदार यादीत नाहीत त्यांनी त्वरित नमुना नं. ६ चा फॉर्म भरून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना मतदान केंद्रावर द्यावे, असे आवाहन केले आहे. दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी (नमुना नं. ६, ६ अ, ७ व ८) ९ डिसेंबरपर्यंत आहे. २६ डिसेंबरपर्यंत दावे व हरकती निकालात काढण्यात येणार आहे. मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी ५ जानेवारी २०२३ ला करण्यात येणार आहे.
ज्यांच्याकडे मतदान ओळखपत्र आहे अशाही मतदारांनी मतदान केंद्रावर जाऊन त्यांची नावे मतदार यादीमध्ये असल्याची खात्री करावी. मतदार याद्या तपासणीसाठी मतदान केंद्रावर उपलब्ध असतील. विशेष मोहिमेच्यावेळी राजकीय पक्ष मतदान केंद्रस्तरीय सहाय्यक उपस्थित ठेवू शकतील. या विशेष मोहिमांचा लाभ रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीकांत गायकवाड यांनी केले आहे.