श्रावण येथे नृत्य स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्रावण येथे नृत्य स्पर्धा
श्रावण येथे नृत्य स्पर्धा

श्रावण येथे नृत्य स्पर्धा

sakal_logo
By

श्रावण येथे
नृत्य स्पर्धा
कणकवली, ता. १७ ः सहाआसनी मॅजिक रिक्षा संघटना (कणकवली-आचरारोड) यांच्यावतीने २६ ला श्रावण येथील मारुती मंदिर परिसरात रेकॉर्ड स्पर्धा आयोजित केली आहे. शनिवारी सकाळी धार्मिक कार्यक्रम, सायंकाळी भजने, रात्री ग्रुप डान्स व सोलो डान्स जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा होणार आहे. ग्रुप डान्ससाठी १० हजार, ७ हजार, ५ हजार, उत्तेजनार्थ ५०० रुपये, सोलो डान्ससाठी ५ हजार, ३ हजार, २ हजार, उत्तेजनार्थ १ हजार रुपये अशी पारितोषिके आहेत. ग्रुप डान्स स्पर्धेत प्रथम येणाऱ्या १२ संघांना सहभाग दिला जाईल. अधिक माहितीसाठी अजय परब, विजय सावंत, अभिनंदन मुंज, अनिल मुळये, जयंत घाडीगावकर यांच्याकडे संपर्क साधावा.
................
रेल्वेस्थानक रस्ते
दुरुस्ती लवकरच
कणकवली, ता. १७ ः कोकण रेल्वेच्या हद्दीतील कणकवली रेल्वेस्थानक ते नरडवे रोड व ओरोस रेल्वेस्थानक ते रानबांबुळी मुख्य रोड हे दोन्ही रस्ते पूर्णतः खड्डेमय झाले आहेत. रेल्वेस्थानकावर जाणाऱ्या, येणाऱ्या प्रवाशांना याचा त्रास होत आहे. धुळीचा त्रास देखील प्रवाशांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे आमदार वैभव नाईक यांनी नवी
मुंबई बेलापूर येथील कोकण रेल्वेचे चीफ इंजिनिअर नागदत्त यांच्याशी चर्चा करत दोन्ही रस्ते १५ दिवसांत दुरुस्त न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा मागील आठवड्यात दिला होता. त्यांच्या मागणीची दखल घेऊन नागदत्त यांनी लवकरच हे दोन्ही रस्ते दुरुस्त करण्याची ग्वाही दिली असल्याची माहिती आमदार नाईक यांनी दिली.
..................
कट्टा-गुरामनगरी
जत्रोत्सव रविवारी
मालवण, ता. १७ ः कट्टा-गुरामनगरी येथील देव लिंगेश्वर-भराडी देवी वार्षिक जत्रोत्सव (दहिकाला) रविवारा (ता. २०) साजरा होणार आहे. यानिमित्त रात्री ८.३० वाजता पालखी मिरवणूक, १२ वाजता मामा मोचेमाडकर दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. भाविकांनी दहिकाला उत्सवास उपस्थित राहवे, असे आवाहन दीपक गुराम यांनी केले आहे.
..................
कुणकेरी भावई
जत्रोत्सव आज
सावंतवाडी, ता. १७ ः कुणकेरीचे ग्रामदैवत भावई देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव उद्या (ता. १८) होणार आहे. मंदिरात सकाळी धार्मिक कार्यक्रम आटोपल्यानंतर देवीला भरजरी वस्त्र व सुवर्णालंकारांसह आकर्षक फुलांनी सजविण्यात येणार आहे. या दिवशी देवस्थान मानकऱ्यांच्या उपस्थितीत देवीची मानाची ओटी भरल्यानंतर दर्शनासाठी रात्री उशिरापर्यंत भाविकांची गर्दी होते. रात्री १० वाजता सवाद्य पालखी मिरवणुकीनंतर उशिरा आरोलकर दशावतार कंपनीचे नाटक होणार आहे.
.................
शिरोडा नितकारी
जत्रोत्सव २२ ला
वेंगुर्ले, ता. १७ : शिरोडा-देऊळवाडी येथील श्री देव नितकारी देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव मंगळवारी (ता. २२) होणार आहे. यानिमित केळी ठेवणे, फटाक्यांची आतषबाजी, वालावलकर दशावतार कंपनीचे नाटक आदी कार्यक्रम होणार आहेत. या जत्रेला ''अर्धी जत्रा'' असेही संबोधतात. भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
...................