मनसे आस्थापना संघटकपदी देसाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मनसे आस्थापना संघटकपदी देसाई
मनसे आस्थापना संघटकपदी देसाई

मनसे आस्थापना संघटकपदी देसाई

sakal_logo
By

swt१७३.jpg
६२९४६
दोडामार्गः पदाधिकाऱ्यांकडून नियुक्तीपत्र स्वीकारताना अभय देसाई.

मनसे आस्थापना संघटकपदी देसाई
दोडामार्ग : महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते, साधन-सुविधा व आस्थापना जिल्हा संघटकपदी स्थापत्य अभियंता अभय देसाई यांची नियुक्ती केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, नेते अमित ठाकरे यांच्या आदेशानुसार रस्ते, साधन-सुविधा व आस्थापना राज्य अध्यक्ष योगेश परुळेकर, कार्याध्यक्ष रावसाहेब कदम, सरचिटणीस विजय जाधव, उपाध्यक्ष अमित शिंदे यांच्याकडून मुंबई येथे सिंधुदुर्ग उपजिल्हा संघटकपदी नियुक्तीचे पत्र देण्यात आले. जिल्ह्यातील पायाभूत सुविधांबाबत रचनात्मक कार्ये व लोकहिताचे सामाजिक उपक्रम संघटनेच्या माध्यमातून राबविणार असल्याचे देसाई यांनी यावेळी स्पष्ट केले. नियुक्तीपत्र स्वीकारताना जिल्हा संघटक अमोल जंगले उपस्थित होते.
...................
पीक पाहणीसाठी २५ पर्यंत मुदतवाढ
सिंधुदुर्गनगरी : तलाठी स्तरावरील पीक पाहणी करण्यासाठी १५ नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली होती. क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार तलाठीस्तरावरील पीक पाहणीची खरीप हंगामासाठी कालमर्यादा १५ ऐवजी २५ पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तालुक्यातील सर्व तलाठी व मंडळ अधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या निदर्शनास आणून द्यावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयकृष्ण फड यांनी केले आहे. ई-पीक पाहणी प्रकल्पाची अंमलबजावणी जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमिअभिलेख पुणे यांच्या कार्यालयामार्फत करण्यात येत आहे.