वेंगुर्लेत भाजपतर्फे बिरसा मुंडांना अभिवादन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वेंगुर्लेत भाजपतर्फे बिरसा मुंडांना अभिवादन
वेंगुर्लेत भाजपतर्फे बिरसा मुंडांना अभिवादन

वेंगुर्लेत भाजपतर्फे बिरसा मुंडांना अभिवादन

sakal_logo
By

swt१७६.jpg
६२९४९
वेंगुर्लेः येथील भाजपच्यावतीने भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करताना भाजपचे पदाधिकारी. सोबत इतर.

वेंगुर्लेत भाजपतर्फे बिरसा मुंडांना अभिवादन
कातकरी वस्तीमध्ये साहित्य वाटप; राष्ट्रीय जनजाती गौरव दिवस साजरा
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १७ ः वेंगुर्ले भाजपच्या वतीने भगवान बिरसा मुंडा यांची जयंती अर्थात राष्ट्रीय जनजाती गौरव दिवस साजरा केला. वेंगुर्ले तालुका कार्यालयात भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर वेंगुर्ले शहरातील कॅम्प येथील कातकरी समाजाच्या वस्तीमध्ये जाऊन महिलांना साड्या व पुरुषांना ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले.
यावेळी जिल्हा सरचिटणीस अॅड. प्रसन्ना देसाई म्हणाले, "राष्ट्रीय जनजाती गौरव दिवस म्हणजे देशातील १२ कोटी अनुसूचित जनजाती समाजाच्या स्वाभिमानाचा, अस्मितेचा आणि भारतीय इतिहासात जनजाती बांधवांच्या गौरवशाली, शौर्यशाली आणि तेजस्वी पराक्रमाच्या योगदानाची सुवर्ण अक्षरांनी दखल घेणारा अविस्मरणीय असा ऐतिहासिक दिवस होय. जननायक क्रांतीसुर्य बिसरा मुंडा यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८७५ ला झारखंड राज्यातील उलीहातु येथे झाला. आदिवासी समाजामध्ये मोठी क्रांती घडविण्यासाठी त्यांचे नाव घेतले जाते. आदिवासी समाजाच्या उलगुलान आंदोलनाचे ते जनक होते. त्यांना धरतीबाबा म्हणून ओळखले जायचे. त्यांनी आदिवासी समाजात केलेली जनजागृती आणि व्यापक मानवसेवेमुळे आजही असे धरतीबाबा मिळावेत, अशी प्रार्थना संपूर्ण देशात केली जाते. म्हणून आदिवासी भागामध्ये क्रांतीकारी बिसरा मुंडा ईश्वरासमान पुजले जातात."
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अॅड. सुषमा खानोलकर, महिला मोर्चा तालुका अध्यक्षा स्मिता दामले, शहर अध्यक्षा प्रार्थना हळदणकर, जिल्हा सरचिटणीस रेखा काणेकर, कुडाळ शहर अध्यक्षा मुक्ती परब, माजी नगराध्यक्षा डॉ. पुजा कर्पे, उपनगराध्यक्षा शितल आंगचेकर, साईप्रसाद नाईक, बाळा सावंत, मच्छीमार सेलचे दादा केळुसकर, तालुका सरचिटणीस बाबली वायंगणकर, तालुका उपाध्यक्ष मनवेल फर्नांडीस, युवा मोर्चाचे नारायण कुंभार, पींटु सावंत, सोशल मीडियाचे अमेय धुरी, बुथ अध्यक्ष सुधीर पालयेकर, पुंडलिक हळदणकर, नगरसेवीका श्रेया मयेकर, ईशा मोंडकर, महिला सरचिटणीस वृंदा गवंडळकर, अल्पसंख्याक सेलच्या हसीनाबेन मकानदार, खानोली सरपंच प्रणाली खानोलकर, माजी सरपंच समीधा कुडाळकर, ग्रामपंचायत सदस्या लक्ष्मी परब, रिमा मेस्त्री, सावरी शेलटे, नंदिनी आरोलकर, रसीका मठकर, आकांक्षा परब, मानसी परब, कृष्णा हळदणकर उपस्थित होते.