भक्ती महाजन-आळवेंना मराठी विभागाची ''डॉक्टरेट'' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भक्ती महाजन-आळवेंना मराठी विभागाची ''डॉक्टरेट''
भक्ती महाजन-आळवेंना मराठी विभागाची ''डॉक्टरेट''

भक्ती महाजन-आळवेंना मराठी विभागाची ''डॉक्टरेट''

sakal_logo
By

swt175.jpg
62948
भक्ती महाजन-आळवे

भक्ती महाजन-आळवे यांना
मराठी विभागाची ‘डॉक्टरेट’
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १७ः बांदा गावची सुकन्या भक्ती महाजन-आळवे यांना गोवा विद्यापीठाच्या मराठी विभागाची डॉक्टरेट पदवी प्राप्त झाली आहे. ‘संत सोहिरोबानाथ आंबिये यांच्या साहित्याचा भाषिक व वाङमयीन अभ्यास’ हा त्यांच्या संशोधनाचा विषय आहे. गोवा विद्यापीठाच्या माजी विभागप्रमुख डॉ. सुनीता उम्रसकर यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले.
आळवे यांचे राष्ट्रीय पातळीवर शोधनिबंध सादर झाले आहेत. त्या एम. ए. मराठी असून शिक्षणशास्त्र विषयात एम. एड. आहेत. मराठी विषयातील सेट व नेट परीक्षेसाठी त्या पात्र ठरल्या आहेत. त्यांनी आतापर्यंत वक्तृत्व, कथाकथन, निबंध, एकपात्री अभिनय, नाट्य, गायन, वेषभूषा, एकांकिका स्पर्धेत विविध पातळीवर पारितोषिके मिळविली आहेत. सध्या त्या हरमल येथील गणपत पार्सेकर शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या मराठी विभागात कार्यरत आहेत. बांदा भजनी मंडळाचे गिरी महाजन यांच्या त्या सुकन्या, तर बस व्यावसायिक आबा आळवे यांच्या स्नुषा होत. आपल्या यशाचे श्रेय त्यांनी महाजन व आळवे परिवार, शिक्षक वर्ग, ग्रामस्थ, मित्रमंडळी, सहकारी तसेच विविध शैक्षणिक, सामाजिक संस्थांना दिले आहे. त्यांच्या यशाबद्दल गोव्यासह बांदा परिसरात अभिनंदन होत आहे.