माणगाव हायस्कूलचे फुटबॉल स्पर्धेत वर्चस्व | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माणगाव हायस्कूलचे फुटबॉल स्पर्धेत वर्चस्व
माणगाव हायस्कूलचे फुटबॉल स्पर्धेत वर्चस्व

माणगाव हायस्कूलचे फुटबॉल स्पर्धेत वर्चस्व

sakal_logo
By

swt१७८.jpg
६२९५१
माणगावः विजेत्या संघासमवेत मान्यवर.

माणगाव हायस्कूलचे
फुटबॉल स्पर्धेत वर्चस्व
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १७ ः तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेत माणगाव हायस्कूलने वर्चस्व मिळविले. १४, १७ व १९ वर्ष या तिन्ही गटात माणगाव हायस्कूलने प्रथम क्रमांक मिळविला.
कोरोनानंतर तब्बल तीन वर्षानी जिल्ह्यात शालेय फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ झाला. याचे उद्घाटन श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगावच्या मैदानावर प्राचार्य प्रशांत धोंड यांच्या हस्ते झाले. या तालुकास्तरीय स्पर्धेचे तिन्ही गटाचे विजेतेपद माणगाव स्कूलने पटकावले आहे. माणगाव हायस्कूलच्या १४ वर्षे खालील वयोगटात साळगाव हायस्कूलचा एक शून्यने, १७ वर्षे खालील गटात डॉन बॉस्को हायस्कूलचा दोन शून्यने तर १९ वर्षे वयोगटात साळगाव हायस्कूलचा एक शून्यने पराभव करत विजेतेपद पटकावले. सर्व सामाने अत्यंत रोमांचकारक झाले. हे विजेते संघ जिल्हास्तरासाठी विजेते पात्र ठरले आहेत. या स्पर्धेसाठी पंच म्हणून अमोल दळवी, वैभव कोंडसकर, कृष्णा सावंत, आर. एम. कदम, नंदू पिळणकर, संजय पिळणकर, विश्वास धुरी यांनी काम पाहिले. साईड पंच म्हणून लवू सावंत यांनी काम पाहिले. मुख्याध्यापक धोंड, उपमुख्याध्यापक संजय पिळणकर, पर्यवेक्षक चंद्रकांत चव्हाण, सीईओ वि. न. आकेरकर व संस्था पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.