चिपळूण ः वाशिष्ठी दूध प्रकल्प लवकरच ग्राहकांच्या सेवेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः  वाशिष्ठी दूध प्रकल्प लवकरच ग्राहकांच्या सेवेत
चिपळूण ः वाशिष्ठी दूध प्रकल्प लवकरच ग्राहकांच्या सेवेत

चिपळूण ः वाशिष्ठी दूध प्रकल्प लवकरच ग्राहकांच्या सेवेत

sakal_logo
By

फोटो ओळी
- ratchl१७१.jpg ःKOP२२L६२९३८ चिपळूण ः संचालक प्रशांत यादव व सपना यादव.
------------

वाशिष्ठी दूध प्रकल्प लवकरच ग्राहकांच्या सेवेत
प्रशांत व स्वप्ना यादव ; दररोज १० हजार लिटर दूध संकलन
चिपळूण, ता. १७ ः कोकणातील शेतकऱ्यांसाठी पूरक व्यवसायाचा पर्याय उभा करून त्यांना आर्थिक समृद्धी मिळावी यासाठी वाशिष्ठी मिल्क अँड प्रॉडक्ट्स हा प्रकल्प पूर्णत्वास गेला असून लवकरच ग्राहकांच्या सेवेत रूजू होईल, अशी माहिती प्रकल्पाचे संचालक प्रशांत यादव व स्वप्ना यादव यांनी दिली.
ते म्हणाले, ‘चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांनी संस्थेच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात भरीव काम केले आहे. या क्षेत्रातून त्यांनी गरजूंना सुलभ पद्धतीने कर्जपुरवठा करताना सुशिक्षित तरुणांना व्यवसायासाठीदेखील वेळेत कर्जपुरवठा करून स्वावलंबी बनवण्यात मोठा हातभार लावला आहे. कोकणातील शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसाय उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. ही त्यांची भूमिका नेहमीच होती. त्यांच्याच मार्गदर्शनातून पिंपळीखुर्द येथे गेल्या काही महिन्यांपूर्वी वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्सची मुहूर्तमेढ करण्यात आली. दुधासह दही, ताक, लस्सी, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, तूप, सुगंधी दूध या दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन तयार करण्यात आले असून अतिशय दर्जेदार आणि कोणतीही तडजोड न करता तयार होणारे हे दुग्धजन्य पदार्थ ग्राहकांचा विश्वास नक्की सार्थ ठरवतील, अशी आम्हाला खात्री आहे. या प्रकल्पाचे काम सुरू असतानाच स्थानिक शेतकऱ्यांकडून दूध संकलन करण्याचा आम्ही निर्णय घेतला. त्या माध्यमातून मालघर, पिंपळीखुर्द (ता. चिपळूण) आंबडस, चिंचघर दस्तुरी (ता. खेड) या ठिकाणी दूध संकलन केंद्र सुरू करण्यात आली आहेत. या संकलन केंद्रातून दररोज १० हजार लिटर दूध जमा होत आहे. या केंद्रांना शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. यातून शेतकऱ्यांच्या दुधाला वाशिष्ठी डेअरीने उत्तम दर दिला आहे. शेतकरीही या प्रकल्पामुळे समाधानी आहेत. या प्रकल्पातून अनेकांना रोजगार मिळाला. पूरक व्यवसायाचाही अनेक तरुणांना लाभ होणार आहे. हा प्रकल्प आता कोकणवासियांच्या सेवेत रूजू होत असून पहिल्या टप्प्यात ''मिल्क पाऊच'' ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहेत. नंतर टप्प्याटप्प्याने दुग्धजन्य पदार्थदेखील उपलब्ध करून दिली जाणार आहेत.