मजूर संस्था थकबाकीच्या भरण्यासाठी सवलतीची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मजूर संस्था थकबाकीच्या भरण्यासाठी सवलतीची मागणी
मजूर संस्था थकबाकीच्या भरण्यासाठी सवलतीची मागणी

मजूर संस्था थकबाकीच्या भरण्यासाठी सवलतीची मागणी

sakal_logo
By

swt179.jpg
62952
सिंधुदुर्गनगरीः थकीत वर्गणी भरणा करण्यासाठी सवलतीच्या मागणीकरिता उपोषणास बसलेले शिवराम पालव.

थकबाकी भरण्यात सवलतीची मागणी
सिंधुदुर्गनगरीत संस्था अध्यक्षांचे उपोषणः संस्था सात वर्षे बंद
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १७ः मुळदे मजूर संस्थेची थकीत वर्गणी भरणा करण्यासाठी सवलत मिळावी, या मागणीसाठी आज मुळदे मजूर संस्थेचे अध्यक्ष शिवराम पालव यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण आंदोलन केले.
कुडाळ तालुक्यातील मुळदे मजूर संस्थेचे कामकाज गेली सात वर्षे बंद असल्याने संस्थेची वर्गणी भरता आलेली नाही. त्यामुळे ही संस्था थकीत राहिली आहे. ही थकीत वर्गणी भरण्यासाठी सवलत मिळावी, या मागणीसाठी संस्थेचे अध्यक्ष पालव यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय समोर उपोषण केले. या उपोषणाची दखल घेत जिल्हा उपनिबंधक सांगळे यांनी त्यांना चर्चेला बोलावून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. मुळदे मजूर संस्थेचे बंद असलेले कामकाज सुरू करण्यासाठी आवश्यक ते सहकार्य केले जाईल, असे आश्वासन दिले. मजूर सहकारी संस्थेची थकीत वर्गणी भरणा केल्यानंतर संस्थेच्या तांत्रिक वर्गीकरण प्रस्तावाला मंजुरी मिळेल. संस्थेचे कामकाज सुरू झाल्यानंतर संस्थेला मिळालेल्या कामाच्या बिलातून थकीत वर्गणी रक्कम भरणा करावी. त्यासाठी सवलत दिली जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर पालव यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज सकाळपासून सुरू केलेले उपोषण दुपारनंतर थांबवले. यावेळी जिल्हा मजूर संघाचे अध्यक्ष गजानन गावडे उपस्थित होते.