सावंतवाड़ीत शिंदे गटातर्फे शिवसेनाप्रमुखांना अभिवादन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावंतवाड़ीत शिंदे गटातर्फे शिवसेनाप्रमुखांना अभिवादन
सावंतवाड़ीत शिंदे गटातर्फे शिवसेनाप्रमुखांना अभिवादन

सावंतवाड़ीत शिंदे गटातर्फे शिवसेनाप्रमुखांना अभिवादन

sakal_logo
By

swt1710.jpg
62944
सावंतवाडीः शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करताना जिल्हाप्रमुख अशोक दळवी. सोबत भारती मोरे, शुभांगी सुकी, स्वप्ना नाटेकर, सायली होडावडेकर, सुरेंद्र बांदेकर आदी. (छायाचित्र ः रुपेश हिराप)

सावंतवडीत शिंदे गटातर्फे
शिवसेनाप्रमुखांना अभिवादन
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १७ः सत्ता संघर्षानंतर प्रथमच हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी साजरी केली. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या येथील ‘श्रीधर आपार्टमेंट’ संपर्क कार्यालयात शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांच्या हस्ते शिवसेनाप्रमुखांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी नगरसेविका भारती मोरे, शुभांगी सुकी, स्वप्ना नाटेकर, सायली होडावडेकर, लतिका सिंग, गीता सुकी, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश बिद्रे, माजी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, पूजा नाईक, सुवर्णा गाड, गजानन नाटेकर, विश्वास घाग आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला तसेच आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला इतर सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी फुले अर्पण करून आदरांजली वाहिली.
......................